मोका व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी बंटी मंडलीक अखेर वारजे माळवाडी पोलीसांकडून जेरबंद

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :-दि.२०/०२/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व स्टाफ पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे, मनिषा पुकाळे व साईकुमार कारके असे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ५०५/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५१ (२), ३५२,३ (५),१८९ (१), १८९(२), १८९ (४), १९०, १९१(३), ६१(२),१११ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ७ व आर्म अॅक्ट ४ (२५), मु.पो.का.३७(१) (३) सह १३५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (II) ३ (२) व ३(४) या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे आदित्य ऊर्फ बंटी मंडलीक, रा. वारजे माळवाडी, पुणे याचा शोध घेत असताना स्वफमधील पोलीस अंमलदार साईकुमार कारके व म. पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी आदित्य ऊर्फ बंटी मंडलीक हा म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे येथील मोकळ्या मैदानात थांबला असलेबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती ही मा. वरिष्ठांची परवानगी घेवुन वरील नमुद पाहिजे आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणेबाबत सांगितले होते.

प्राप्त बातमीचे अनुषंगाने वरील नमुद अधिकारी व स्टाफ यांनी म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे या परिसरात जावुन शोध घेतला असता वरील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे आदित्य ऊर्फ बंटी मंडलीक हा म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे येथील मोकळ्या मैदानात उभा असलेला मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव, विचारता त्याने त्याचे नाव, आदित्य ऊर्फ बंटी गणेश मंडलीक, वय २२ वर्षे, रा. डी. बिल्डींग, म्हाडा कॉलनी, रोजरी शाळेजवळ, वारजे माळवाडी, पुणे असे सांगितले. त्यास पुढील अधिक चौकशीकरीता ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे इतर अटक साथीदार यांचेसह मिळून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन पुन्हा त्याचेकडे चौकशी करता त्याने व त्याचा अटक साथीदार असे मिळुन करमाळा, सोलापुर येथे पेट्रोल पंपाजवळ एका इसमास लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचेजवळील रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन गेलेबाबत सांगितले. सदरबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ७७९/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा नोंद आहे. वरील नमुद आरोपीस पुढील कारवाईकरीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) १ श्री. गणेश इंगळे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ श्री. नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे, गणेश ढगे, प्रदीप राठोड, दत्तात्रय पवार, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, महेश पाटील, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट