अधिकारी फाउंडेशन मार्फत मोफत “प्रश्न तुमचे उत्तर अधिकाऱ्यांचे” उपक्रम सुरु..

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई : – योग्य मार्गदर्शन यशाची उतुंग इमारत उभा करूं शकते गाव खेड्यातील अनेक प्रतिभावंत आपल्या ध्येयासाठी झगडत असतात मात्र योग्य मार्गदर्शना अभावी त्यांना ध्येयाकडे नेणाऱ्या मार्गात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
त्यामुळेच योग्य शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वामद्ये सुसंवाद व विचार स्वातंत्र्याचा पाया रचत त्याला यशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो याचं धोरणासाठी अधिकारी फाउंडेशन या सामाजिक संघटनेमार्फत देशातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या गावं खेड्यातील UPSC,MPSC, सरळसेवा या परीक्षेतून सहभागी होण्यास आग्रही उमेदवारासाठी अभ्यास करताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीत साथ देण्यासाठी तसेच त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान होण्यासाठी अधिकारी फाउंडेशनने teligram /टेलिग्राम या सोशल मीडिया चॅनल वर “प्रश्न तुमचे उत्तर अधिकाऱ्यांचे” हा चॅनल सुरू केला आहे.
ज्या ग्रुपच्या चॅनल मद्ये क्लास वन अधिकाऱ्यांपासुन ते क्लास 3 अधिकाऱ्यांपर्यंत शंभर पेक्षा जास्त अधिकारी सहभागी असतील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येतं की आपण या ग्रूपवर सहभागी होऊन आपल अधिकारी होण्याचं स्वप्न पुर्ण करावं.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com