नाशिक दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने विभागातील मोबाईल चोर केले जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक :-
मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे व रॉबरी दरोड्याच्या गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री. सिताराम कोल्हे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दरोडा व शस्त्र विरोधी पथक शहर
दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदारांना दि. ३१/०८/२०२३ रोजी खात्रीशीर गुप्त बातमी मिळाली की अंबड पोलीस स्टेशन हद्दीत मोरवाडी स्मशानभुमीच्या शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ दोन इसम चोरीचा मोबाईल विक्री करण्याकरीता येणार आहेत. सदरच्या माहीतीवरून दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने आरोपी इसम नामे
१) अकबर रहीम शेख वय २१ वर्षे राह आसरा चौक, दराडे दुकानाचे मागे, मोरवाडी, नाशिक व
२ ) शुभम चेतन आहिरे वय २४ वर्षे राह. राहुलजी शाळा, शनिमंदीर समोर, काळेमामा चाळ, मोरवाडी, नाशिक यांना सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांचेकडुन अंबड पोलीस ठाणे गुरनं. ४६० / २०२३ कलम ३९२, ३४ भा. दं. वि. या गुन्हयातील जबरीने चोरी केलेले Nothing (1) मोबाईल व रेडमी नोट ९ प्रो मोबाईल असे २ मोबाईल व गुन्हयात वारपलेली अॅक्टीव्ही मो / सायकल हस्तगत करण्यात आले.

सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व | शस्त्र विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि / किरण रोंदळे व पथक १ ) पोहवा / विजयकुमार सुर्यवंशी २) पोअं/ महेश खांडबहाले ३) पोअं / प्रविण चव्हाण ४ ) पोअं. / सागर बोधले ५) पोअं / भरत राउत ६) पोअं/ तेजस मते यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com