मोबाईल चोर आरोपी योगेश किसनराव बमनोटे रा. निंबोरा बोडखा मंगरूळ दस्तगीर हा स्था. गुन्हे शाखा अमरावती यांचा जाळ्यात..

अमरावती

सह संपादक -रणजित मस्के
पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर हद्दीत अज्ञात इसमाने ०१ मोबाईल व नगदी ५०,००० रूपये चोरून नेले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर येथे अप.क्र. २१२/२०२५ कलम ३०५ भा.न्या.सं नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असतांना गोपनीय माहिती वरून नमूद आरोपीस ताब्यात घेवून त्यास विचारपूस केली असता, त्याने गुन्हयाची कबूली दिल्याने गुन्हयात चोरी गेलेला मोबाईल किं.अं. ११,२०० व नगदी ५१००/- असा एकूण १६,३००/- चा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री विशाल आनंद सो., पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा, मा.श्री. पंकज कुमावत सो, अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा., यांच्या मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात पोउपनि मुलचंद भांबुरकर व अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, दिनेश कनोजिया, सचिन मसांगे व चालक प्रज्वल राउत यांनी केली.