रावणवाडी पोलीसांनी मौजा निलज येथे घरफोडी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेवुन मोबाईल फोन व सामान किंमत 20,000/- रुपयेचा मुद्देमाल केला हस्तगत..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस ठाणे रावणवाडी येथे फिर्यादी नामे – संदिप बालचंद हरीणखेडे वय रा. निलज ता. जि. गोंदिया यांचे मोबाईल रिपेरींग, इलेक्ट्रानिक्स, फर्निचर नावाची दुकान हुडकाटोला बसस्टाप येथे असुन घटना ता.२९/०१/२०२४ चे सायं.१९/०० वा.ते दि. ३०/०१/२०२४ चे सकाळी ०९/०० वा.दर. फिर्यादीचे दुकानाचे शटरचा ताला तोडुन दुकानातील ०२ विओ कंपनिचे मोबाईल हँडसेट व काऊंटरच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेला एम.आय. कंपनी चा मोबाईल हँडसेट प्रत्येकी ५,०००/- रुपये प्रमाने १५,०००/- रुपयेचे तसेच काऊंटरचे ड्राव्हर मध्ये ठेवलेले नगदी ५२,०००/-रुपये व मोबाईल चार्जर व इतर सामान किंमती अंदाजे ५,०००/-रुपयेचा असा *एकुण ७२,०००/-रु.चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे रावणवाडी येथे अप.क्रं. ४२/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते….
सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, यांनी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हा उघड करण्याचे निर्देश सूचना दिल्या होत्या….
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, मॅडम, पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सदर गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे रावणवाडी पोलीस पथकाने गुप्त बातमीदार तर्फे प्राप्त माहिती व तांत्रिक दृष्ट्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे संशयीत इसम नामे– १) नितीन श्रीराम कावरे वय १९ वर्ष व
२) विधी संघर्षग्रस्त बालक वय १५ वर्ष ५ महिने दोन्ही रा. सागरटोली (निलज) पो. दासगांव ता. जि. गोंदिया
यांचे नमूद गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवून तपास करण्यात आला…. नमुद आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी नमूद गुन्हा केल्याचे तापासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमालपैकी-
१) दोन विवो कंपनीचे काळ्या रंगाचा मोबाईल हँडसेट किंमती १०,०००/-रुपये
२) एक एम.आय कंपनीचा मोबाईल हँडसेट किंमती ५,०००/- रुपये, व इतर सामान ५०००/-रुपये असा एकुण किंमती २०,०००/-रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे… नमूद आरोपी दि.०७/०३/२०२४ पर्यंत पोलीस कोठडीत असुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे…..
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर मॅडम यांच्या मार्गदर्शखाली पोलीस ठाणे रावणवाडीचे पो.नि.श्री. पुरूषोत्तम अहेरकर, स.पो.नि. दिनेश बागुल, श्रेणी पोउपनि दिपक पाटील, पो.हवा. संजय चौव्हाण पो. शि. दुर्गेश टेंभरे, पो.शि. छगन विठठले यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com