मनसे विद्यार्थी सेनेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत अध्यक्ष श्री.अमितजी ठाकरे यांच्या हस्ते फलकांचे अनावरण…

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल

मुंबईत सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळपासूनच तरुणाईचा उदंड उत्साह, प्रचंड जल्लोष पहायला मिळाला. तरुणाईचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबईतील अनेक महाविद्यालयांचा परिसर मनसेमय- मनविसेमय झाला. झेंडे, पताका, ढोल पथक आणि महाविद्यालयीन तरुण तरुणींची न भूतो न भविष्यती अशी गर्दी केली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनी, सोमवारी सकाळीच संघटनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे साहेब यांनी कुलाबा विधानसभेतील सिद्धार्थ महाविद्यालय – आनंदभवन आणि बुद्धभवन, मलबार हिल विधानसभेतील भवन्स महाविद्यालय, वरळी विधानसभेतील लाला लजपतराय महविद्यालय आणि माहीम विधानसभेतील कीर्ति महाविद्यालय येथे मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलकाचे अनावरण केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी आणि खूप मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट