मनसे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख श्री दिलीप नाईक यांचे मुंबई महापालिकेला चौपाटीकडे जाणाऱ्या पुलाच्या पायऱ्या दुरुस्ती करण्याचे निवेदन सादर…

प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई:
मा. प्रमुख अभियंता (पुल)
मुंबई महानगरपालिका
यांस
जय महाराष्ट्र!
विषय : महर्षी कर्वे रोड येथून चौपाटीला जाणारा कैवल्यधाम कडे जाणारा पुल दुरुस्त करणेबाबत

महोदय,
चर्नी रोडच्या दक्षिणेला असणारा पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या बाबत दररोज या पुलाचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी जुलै महिन्यात तक्रार केली होती. दिड दिवसाचे गणपती विसर्जन करताना या पुलाचा वापर करण्यात आला. तेव्हा पुलाचा दोन पायऱ्या तुटल्या आहेत. इतर पायऱ्या सुद्धा नादुरुस्त असून अनंत चतुर्दशीला जेव्हा हजारो नागरिक या पुलावरून दर वर्षी जातात तसे जातील तेव्हा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. आपणास विनंती आहे की आपण ह्या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकारी वर्गाला याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत.
धन्यवाद.

आपला नम्र
दिलीप नाईक
विभाग प्रमुख
दक्षिण मुंबई विभाग क्र. १४

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com