मनसे मुंबादेवी विधानसभा आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई :-सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने श्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभा आयोजिaत विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थी पालक मार्गदर्शन शिबिर माधवबाग,गिरगाव, मुंबई 4 येथे शनिवारी दिनांक २२ जुन २०२४ रोजी संध्याकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर वेळी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात सहभाग घेत कार्यक्रमाचा आस्वाद पुरेपूर घेतला.
अनेक 90% व त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह बक्षीसरुपी भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला तसेच 60 टक्के व त्यापेक्षा अधिक असलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीसरुपी भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रथमेश साळेकर सर तसेच त्यांच्या आग्रहाने आलेले विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्त्व या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभले.
प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे सरचिटणीस सौ रिटाताई गुप्ता मनसे सरचिटणीस श्री संजय भाई नाईक महिला सरचिटणीस सुप्रियाताई दळवी सोबत उपसंघटक श्री धनराजभाई नाईक या सर्व मान्यवरांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थी व पालकांना विशेष मार्गदर्शन सुद्धा केले.
उपस्थित विद्यार्थी व पालकांनी सदर उत्कृष्ट आयोजनाबद्दल विभाग अध्यक्ष श्री प्रशांत गांधी व महिला विभाग अध्यक्ष सौ आरती पडवळ यांचे आभार व्यक्त केले.

















सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात करीता मुंबादेवी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, उपविभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष व अंगीकृत सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com