मनसे मागाठाणे गट क्र. 11 तर्फे मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप…

0
Spread the love

बोरीवली (पुर्व) : काॅसमाॅस शाळा , गणेश चोक, काजूपाडा, येथे दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 6 : 30 वाजताच्या सुमारास मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या शुभर्शीवादाने ,मनसे नेते मा.श्री. अमित ठाकरे साहेब,मनसे नेते मा.श्री. मा. अविनाश अभ्यंकर आणि मनसे सरचिटणीस मा. श्री. नयनभाई कदम,मनसे मागाठाणे विभाग अध्यक्ष मा.श्री. विलास मोरे व विभाग अध्यक्षा मा. श्रीमती शिल्पाताई सावंत, उपविभाग अध्यक्ष मा. श्री .प्रकाश घोसाळकर या मान्यवरांच्या विश्वासाने मागाठाणे गड क्र. ११ शाखा अतंर्गत सर्व “आजी व माजी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा” बोरिवली, पूर्व येथे वरिष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.

श्री. विजय सावंत


श्री . प्रताप इंगळे
श्री. अमित सावंत
श्री. अरविंद नाईक
श्री. संतोष बगलानिया
श्री. सचिन पवार

या प्रसंगी नवनियुक्त उपशाखा अध्यक्षांसह गट अध्यक्षांना गट क्र. 11 चे शाखा अध्यक्ष मा.श्री. राजु माने आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते “नियुक्तीपत्र” प्रदान करुन पक्ष कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

या वेळी आपल्या सर्व आजी व माजी महिला – पुरुष उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात मा श्री. विजय सावंत व मा.श्री. प्रताप इंगळे यांना उपशाखा अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच मा.श्री. अरविंद नाईक , मा.श्री. संतोष बगलानिया व मा.श्री. सचिन पवार यांना गट अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र आणि मा.श्री. अमित सावंत यांना गट उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट