स्पर्धेतून राष्ट्रीय संघ निवडला जाणार याचा मला आनंद – आमदार राजेश पाटील…

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :- 65 व्या राज्यस्तरीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेच्या शानदार शुभारंभ

पालघर दि. 14. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर यांच्या वतीने पालघर जिल्ह्यामध्ये सफाळ्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा बहुमान माझ्या मतदारसंघाला मिळाला आहे. याचा मला अभिमान आहे. या स्पर्धा आयोजन करत असताना राज्यांमध्ये स्पर्धेच्या जबाबदारी मिळवण्यासाठी फार चढाओढ असते त्यामध्ये आपल्या जिल्ह्याला ही स्पर्धा मिळाली आहे. कबड्डी खेळ वाढावा यासाठी मी स्वतः क्रीडामंत्री मुख्यमंत्री यांच्याशी वैयक्तिकरित्या भेटून ही स्पर्धा पालघर जिल्ह्याला घेण्यात यावी यासाठी आग्रह धरला होता तेव्हा त्यांनी ही स्पर्धा आपल्याला दिली ही स्पर्धा आपल्याला मिळाल्याची मानसिक समाधान मला आहे व या स्पर्धेतून राष्ट्रीय संघ निवडला जाणार आहे याचा मला सार्थ अभिमान असे प्रतिपादन बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी सभा येथे केले.

65 व्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन सोहळा डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था सफाळे येथील राजगुरू ह.म. पंडित विद्यालयाच्या पटांगणावर पार पडला. यावेळी आमदार राजेश पाटील , पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण राऊत, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, वैदेही वाढाण,दीपक भाते खांती दोषी तारापुर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी रणवीर शर्मा एस एन शर्मा उदयन सावे आदी मान्यवर उपस्थित होते

पालघर जिल्ह्यात कबड्डीला प्रोत्साहन मिळावे ही माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद मला आज लाभला आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पालघर जिल्ह्यात आयोजित करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मी करीन लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः कबड्डी खेळासाठी मेहनत घ्यायची माझी तयारी आहे तारापूर मनुफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक भाते व पालघर जिल्हा कबड्डी असो शिक्षण चे अध्यक्ष प्रवीण राऊत जिल्हा क्रीडा अधिकारी असतील त्यांना मी विनंती करतो की पुढच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धा घेण्याविषयी जी काही मदत लागेल ती मी लोकप्रतिनिधी म्हणून करायला तयार आहे. जी काही मदत लागेल ती हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मी करीन असेही यावेळी पाटील यांनी सांगितले

प्रो कबड्डी मुळे व्यावसायिक खेळाडू निर्माण व्हायला लागले आहेत कबड्डी मुळे आर्थिक बळ सुद्धा खेळाडूंना मिळत आहे कबड्डी खेळाची जाळे निर्माण करण्यासाठी खेळाच्या संघटना असतील उद्योजकांच्या संघटना असतील त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर तुम्ही प्राविण्य प्राप्त केल्यास शासनाच्या नोकरीमध्ये थेट नियुक्ती वर्ग एक दोन तीन मध्ये होऊ शकते पाच टक्के आरक्षण खेळाडूंसाठी ठेवण्यात आले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी जोड द्या व अधिकारी पदावर तुम्ही रुजू व्हा, भविष्यात पालघर जिल्ह्यातील खेळाडू ऑलिंपिक स्तरावर कसे खेळतील याकडेही क्रीडा विभागाने लक्ष द्यायला हवे असेही यावेळी पाटील यांनी सांगितले.

पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यात कबड्डीची राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर आणि मुंबई हे सात विभाग सहभागी झाले आहेत. यावेळी पंडित विद्यालयातला विदिष राऊत या इयत्ता सातवी शिकणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील योगापटूने प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमाची वास्तविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमानी यांनी केले तर आभार ह.म. पंडित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी यांनी मांनले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट