मित्रानेच मैत्रीणीवर मित्रासह वाढदिवसाच्या बहाण्याने जंगलात नेऊन दारु पाजून केला बलात्कार…!

0
Spread the love

पुणे : दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी तळजाई सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका मित्राने वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह पुण्यातील एका २२ वर्षीय तरुणीला जंगलात नेऊन त्याठिकाणी तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलीसांकडे २२ वर्षीय पिडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी शुभम सिताराम शिंदे वय-१९ वर्षे,रा.धनकवडी,पुणे या आरोपीला जेरबंद केले आहे.

आरोपी शुभम शिंदे याने 5 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याचे सुमारास वाढदिवस असल्याचे सांगत पार्टी करण्यासाठी तळजाई शेवटचा बसस्टॉप याठिकाणी भेट असे सांगितले.

त्यानंतर प्रतिक माने या मित्रासह शिंदे तरुणीला भेटला व सदर तिघे तळजाई येथील जंगलात दारु पिण्यासाठी गेली. त्याठिकाणी दारु पिल्यानंतर तरुणीला थंडी वाजू लागल्याने ती त्याचठिकाणी बाजूला झोपली होती.

त्यावेळी आरोपी शिंदे याने तिच्याशी जवळीक साधत तरुणी प्रतिकार करत असताना ही तिला विवस्त्र करत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत तरुणीने घडलेल्या प्रकाराची कुटुंबीयांशी चर्चा करुन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट