बालकांना नविन कौशल्य आत्मसात करण्यासाठी पुणे पोलीसांतर्फे *मिशन परिवर्तन* उपक्रमाचे आयोजन संपन्न ..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे ;पुणे पोलिस आयुक्तालयाच्या “मिशन परिवर्तन – नवी दिशा, नवा प्रवास” उपक्रमांतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात आठ विधी संघर्षग्रस्त बालकांना जूट बॅग निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान बालकांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत स्वतःच्या हाताने जूट बॅग तयार केल्या आणि स्वावलंबी होण्याचा संकल्प केला.या उपक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी बालकांचे कौतुक करत, त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी मार्गदर्शन केले. “मिशन परिवर्तन” हा उपक्रम बालकांना नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.