विविध वाहन चोरीच्या गुन्हयांतील व वाहनातील चोरी करणारे आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केले जेरबंद…..

सह संपादक -रणजित मस्के
जळगाव


जळगाव जिल्हयांत मोठ्या प्रमाणात वाहन चोरीचे गुन्हे तसेच इतर चोरीचे गुन्हे घडत असल्याने मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो., पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवून आरोपी निष्पन्न करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करुन त्यांना वाहन चोरी व इतर चोरीतील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हे उघडकिस आणण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे दि.01/07/2025 व दि.03/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पथकाने खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणून गुन्हयांतील मुद्देमाल वाहने व रोख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. पथक
क्रमांक :- 01 :- पोउनि श्री. शरद बागल, पोउनि. श्री. सोपान गोरे, सफौ/अतुल वंजारी, पोहेको/सुनिल दामोदरे, अक्रम याकुब शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, विजय पाटील, पोकों/किशोर पाटील, रविंद्र कापडणे, चापोकॉ महेश सोमवंशी
चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.272/2025 तसेच नाशिक रोड पो.स्टे. जि. नाशिक CCTNS नं.342/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) हे गुन्हे दि.01/07/2025 रोजी दाखल होते. या गुन्हयांतील चोरी झालेल्या प्रवासी रिक्षा आरोपी 1) सादिक अली सैय्यद अली वय 40 मुळ रा. पिंप्राळा हुडको, 120 खोल्या अली मशिद जवळ, जळगाव ता.जि. जळगाव ह.मु. अक्सा नगर, मेडीकल जवळ, वरणगाव ता. भुसावळ जि. जळगाव व विधी संघर्षी बातक यांचे कडे पिंप्राळा हुडको परिसरात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांचेकडेस चौकशी केली असता त्यांचेकडे वरील गुन्हयांतील एकूण 1,20,000/- रुपये किंमतीच्या 02 प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहे. तसेच पिंप्राळा हुडको, जळगाव परिसरात वेगवेगळे चेसिस नंबर, इंजिन नंबर व आरटीओ नंबरच्या 03 प्रवासी रिक्षा वापरत असल्याची माहिती मिळाल्याने त्या रिक्षा बाबत खात्री केली असता सदर रिक्षाचे कोणते कागदपत्र नसुन त्यांचे इंजिन नंबर, चेसिस नंबर व आरटीओ नंबर वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाल्याने 03 रिक्षा बाळगणारे इसमांविरुध्द रामानंदनगर पो.स्टे.ला CCTNS नं. 244/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 3,30,000/- रुपयाच्या .05 प्रवासी रिक्षा वरील पथकाने जप्त केल्या आहेत.
पथक क्रमांक : 02 :- श्रेपोउनि. रवि पंढरीनाथ नरवाडे, पोहेकों/गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ संदीप चव्हाण
भुसावळ तालुका पो.स्टे. CCTNS नं. 150/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे 3,50,000/- रुपये किंमतीचे टॅक्टर चोरी झाल्याबाबत दि.01/07/2025 रोजी दाखल झाला होता. त्याप्रमाणे सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपीताचा वरील पथक हे रात्रगस्त पेट्रोलींग फिरतांना त्याचा शोध घेत होते. त्यांना पेट्रॉलींग दरम्यान एक इसम एक निळ्या रंगाचे टॅक्टर घेवून जातांना दिसल्याने सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने त्यांचे जवळ जावून त्यास टॅक्टर बाबत विचारपुस करता त्याने कळविले की, मी सदरचे टॅक्टर साकेगाव ता. भुसावळ येथून चोरी केले असून ते विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचे सांगितल्याने पथकात अंमलदार यांनी त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आरोपी अनिकेत संतोष पाटील रा. साकेगाव ग्राम पंचायत जवळ, ता. भुसावळ असे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेले 3,50,000/- रुपये किंमतीचे टॅक्टर वरील दाखल गुन्हयांत जप्त करण्यात आलेले आहे.
पथक क्रमांक :- 03 :- पोउनि. श्री, शेखर डोमाळे, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकों/लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील,पोकॉ/जितेंद्र पाटील, पोकों/भुषण पाटील
भडगाव शहरात राहणारा 01) शेख इमरान शेख रफिक हा मोटार सायकली चोरी करीत असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा पथकातील पोलीस अंमलदार यांनी शोध घेवून त्यांस विचारपुस करता त्याने सांगितले की, मी माझासाथीदार आरोपी नं.02 शेख अकिल शेख रफिक वय 27 रा. जलालली मोहल्ला, भडगाव अशांनी भडगाव शहरातुन 02 मोटार सायकल व 01 मोटार सायकल धुळे येथून चोरी केल्याचे कबुली देवून गुन्हयांतील 03 मोटार सायकल एकूण 1,05,000//-किमंतीच्या जप्त करण्यात आल्या आहे. सदर पथकाने भडगाव पो.स्टे. CCTNS नं.226/2025 व भडगाव पो.स्टे. CCTNS नं.250/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) हे गुन्हे उघडकिस आणलेले आहेत. सदर गुन्हयांत अटक करण्यात आलेला आरोपी शेख इमरान शेख रफिक रा. भडगाव ता. भडगाव यांचेवर यापुर्वी 01 खुनाचा गुन्हा, 01 खुनाचा प्रयत्न
व 04 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पचक क्रमांक : 04:- श्रेपोउनि, रवि पंढरीनाथ नरवाडे, पोहेकों/गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ संदीप चव्हाण
वरणगाव पो.स्टे. CCTNS नं. 62/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) या गुन्हयांत 45,000/- रुपये किंमती मोटार सायकल चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयांतील आरोपी वावत गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, भुसावळ शहरातील समीर शेख अयुब शेख रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ याचे कडेस चोरीची मोटार सायकल आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर संशयीत याचे घरी जावून शोध घेतला असता समीर शेख अयुब शेख रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ हा मिळून आला व त्यांचे घरा समोर वरील गुन्हयांतील चोरीची मोटार सायकल 45,000/- रुपये किंमती मिळून आल्याने ती वरील गुन्हयांत जप्त करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
पथक क्रमांक : 05:- पोउनि. श्री. शरद वागल, पोहेकॉ/प्रविष्ण भालेराव, पोहेकॉ/मुरलीधर धनगर, पोहेकॉ/सिध्देश्वर डापकर, चापोकॉ महेश सोमवंशी
दि.27/06/2025 रोजी रात्री जळगाव शहरातील गोंविदा रिक्षा स्टॉप येथे उभ्या असलेल्या महेंद्र पिकअप वाहनाचे दरवाजाचे कुलूप व कोंडा तोडून सदर वाहनातील एकूण 4,02,075/- रुपये किंमतीच्या सिगारेट चोरी झाल्याने जळगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.261/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (क) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांच्या घटनास्थळा असलेल्या CCTV कॅमेऱ्या फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुन प्राप्त त्याआधारे संशयीत 1) सागर राजु घोडके वय 28 रा. विदयानगर झोपडपट्टी जवळ चिंचवड, पुणे याचा सहभाग असल्याचा संशयावरुन सदर पथक तांत्रीक विश्लेषणा वरुन सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे असा पाठलाग करत जावून त्यास पुणे येथून ताब्यात घेवून त्यास गुन्हयांतील चोरी झाल्याबाबत व त्याचे साथीदारा बाबत विचारपुस करता त्यांने कळविले की, त्याचे सोबत 2) अभिजित ऊर्फ कुवडया तुळशिदास विटकर वय 25 रा. रामनगर बापकर चाळ चिंचवड, पुणे, 3) काशिद अलिमुद्दीन अन्सारी वय 22 रा. विदयानगर इ गोपडपट्टी जवळ चिंचवड, पुणे, 4) आकाश ऊर्फ बंटी भवारसिंग राजपुत वय 23 रा. विदयानगर झोपडपट्टी जवळ, चिंचवड, पुणे अशांनी चोरी केली असून आम्ही सदर सिगारेट रस्त्याने स्थानिक नागरिकांना विक्री केल्या आहे. त्यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती चोरीच्या सिगारेट विक्री केल्याचे एकूण 3,00,000/- रुपये रोख मिळून आल्याने ते गुन्हयांकामी जप्त करण्यात आलेले आहे. आरोपी नं.01 ते 03 यांना वरील गुन्हयांत अटक करण्यात आलेली आहे.
पथक क्रमांक : 06:- पोउनि. श्री. जितेंद्र वल्टे, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ/प्रविण मांडोळे, पोहेकों/हरिलाल पाटील,पोकों/राहुल कोळी
अमळनेर पो.स्टे. CCTNS नं. 241/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे 16/06/2025 रोजी दाखल असून गुन्हयांत 1,60,000/- रुपये किंमतीचे टॅक्टर चोरी झाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करुन अमळनेर पासुन ते जळगाव नेरी नाका मशानमुभी पावेतो विविध ठिकाणचे CCTV फुटेज चेक करत अज्ञात आरोपी चोरी झालेल्या टॅक्टरचा वरील पथकाने शोध घेतला असता सदर अज्ञात आरोपीने चोरी केलेले टॅक्टर हे जळगाव शहरात नेरी नाका जवळी मशानमुभी जवळ सोडून दिल्याने वरील पथकाने सदरचे टॅक्टर हे वरील गुन्हयांकामी जप्त केले आहे. सदर अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे चालु आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे वरील पथकाने गेल्या 03 दिवसात एकूण 09 वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे उघडकिस आणून एकूण 12,90,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदरची कार्यवाही ही मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव वरील पथकांनी कामगिरी केली आहे.