हरवलेले ३० मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना परत देण्यात मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास मोठे यश…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

मिरारोड :- मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातुन रहदारी करणारे इसमांचे मोबाईल फोन हरविण्याचे प्रमाण अधिक असुन सदरबाबत जनतेने मिरारोड पोलीस ठाणेच्या लॉस्ट अॅण्ड फाऊंड प्रणालीवर ऑनलाईन तक्रारी केलेल्या होत्या. मोबाईल हरविण्याचे प्रमाण अधिक असल्याने सदर मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत मा.वरीष्ठांना मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या होत्या त्या अनुशंगाने मिरारोड पोलीस ठाणेत प्राप्त झालेल्या तक्रारींचे अवलोकन करुन हरविलेल्या मोबाईल फोनबाबत ceir portal चे माध्यमातुन तसेच हरविलेल्या मोबाईल फोनच्या आय. एम. ई. आय क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करुन मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला आहे. सन २०२३ मध्ये मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास एकुण ३ लाख रुपये रक्कमेचे ३० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असुन ते मुळ मालकांना परत करण्यात येत आहेत.

सदरची कामगिरी श्री.जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, मिरारोड, श्री. महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / संतोष सांगवीकर, सपोनि / रामकृष्ण बोडके, पोउपनि / किरण वंजारी, स.फौ.प्रशांत महाले, पोहवा / प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, पो. अमं. शंकर शेळके, अथर्व देवरे यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट