मिरज शहरातून मोटारसायकल चोरणारे कर्नाटकी चोरटे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे ताब्यात..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

मिरज ;

YAMAHA कंपनीची R-15 स्पोर्टस् मोटारसायकल कली हस्तगत

पोलीस स्टेशन

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

गु.घ.ता वेळ व ठिकाण दि. २३.०२.२०२५ रोजी २३.३० वा. निपाणीकर कॉलनी, मिरज

अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. ४४/२०२५

भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) प्रमाणे

गु.दा.ता वेळ दि. २५.०२.२०२४ रोजी

फिर्यादी नाव

सालीच मुस्तफा शेख, वय २१, रा. निपाणीकर कॉलनी, मिरज

माहितीचा खोत

पोलीस हेडकॉन्स्टेबल

कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार

शंकर गायकवाड

मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली
मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्री. प्रणिल मिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर गायकवाड, अभिजीत धनगर, सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेवल राजेंद्र हारगे, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर खोंद्रे, निवास माने सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक श्री अफरोज पठाण, पोकों कॅप्टन गुंडवाडे

संशयित नाव व पत्ता

१) संजू यमनाप्पा मादर, वय २३, रा. कोलार, ता. कोलार, जिल्हा विजापूर,राज्य कर्नाटक

२) चंद्रशेखर ऊर्फ चेतन मल्लाप्पा मुंदीनमनी, वय २३, रा. नागरदिन्ची, ता. कोलार, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक

जप्त मुद्देमाल

एकुण ४०,०००/- रु. किंमतीची YAMAHA कंपनीची R-15 स्पोर्टस् मोटारसायकल

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-

मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली, मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले आहे.

सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा, पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांवाचत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व

अंमलदार यांना सुचित केले होते.

दि. २३.०२.२०२५ रोजी मिरज शहरातील निपाणीकर कॉलनी येथील कोहीनूर रेसिडेन्सी अपार्टमेंटचे पार्कीग मधून YAMAHA कंपनीची R-15 मॉडेलची महागडी स्पोर्टस् मोटारसायकल चोरीस गेले असलेबाबत पोलीस प्रशासनास माहीती मिळाली होती. सदर मोटारसायकल चोरीच्या घटनेबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गु.र.नं. ४४/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तांत्रिक माहीती संकलीत करुन तिचे विश्लेषन करुन सदर मोटारसायकल चोरीचा तात्काळ छडा लावणेवावत आदेशित केले होते. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद डी.बी. पथकाने तात्काळ कारवाई करीत सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तेथील तांत्रिक माहीती संकलीत करुन सदर चोरीचे गुन्हयातील चोरट्यांची माहीती उपलब्ध करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरु केले होते.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकाने इसम नामे संजू यमनाप्पा मादर व चंद्रशेखर ऊर्फ चेतन मल्लाप्पा मुंदीनमनी यांना कोलार, राज्य कर्नाटक येवून ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेली ४०,०००/- रु. किंमतीची YAMAHA कंपनीची R-15 ही महागडी स्पोर्टस् मोटारसायकल हस्तगत केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर गायकवाड हे करीत आहेत.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुध्दे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करुन त्यांचा बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी मालमत्तेविरुध्दच्या गुन्हयाचावत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट