मिरज शहरात गांजा विक्री करणा-या ३ जनांवर गुन्हा दाखल करुन २ किलो ७०० ग्रॅम वजनाचा ६७,५१०/- रु. चा तयार गांजामाल जप्त..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

मिरज ;पोलीस स्टेशनमहात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजअपराध क्र आणि कलमगुर.नं. ६१/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि, कलम ८(क), २० (ख) ii (च), २२(ख)फिर्यादी नावजावेद युसुफ शेख, पोकों ६२५, नेम, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजगु.प.ता वेळ व ठिकाणदि. १३.०३.२०२५ रोजी २०.०३ वा. रॉकेल डेपो झोपडपट्टी जवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ, मिरजगु.दा.ता वेळदि. १४.०३.२०२५ रोजी ००.४९ वा.माहितीचा स्वोतगोपनीय बातमीदारामार्फत पोकों जावेद युसूफ शेख च पोकों मोसीन मिरासाहेब ठितमेकरकारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदारमा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगलीमा. श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदशांनाखालीपोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, अभिजीत पाटील,पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोसीन टिनमेकर, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे चालक पोलीस हेडकॉन्स्टेव निवास मानेसायबर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक श्री अफरोज पठाण, पोकों कैप्टन गुंडवाडे, विजय पाटणकरसंशयित नाव तीन अल्पवयीन बालकेव पत्ताजप्त मुद्देमाल६७,५१०/- रु. चा २ किलो ७०० ग्रॅम तयार गांजा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-मा. भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीसअधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याचायत आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांचावत माहीती उपलब्ध करुन त्यांचेपर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने तात्काळ कारवाई करीत दि. १४.०२.२०२५ रोजी एका संशयिताला अटक करुन त्याचेकडून एकूण ०२ किलो ३०० ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता.तसेच दि. १८.०२.२०२५ रोजी पुन्हा कारवाई करीत एका संशयिताला अटक करुन त्याचेकडून एकूण ०१ किलो ७०० ग्रॅम तयार गांजा असा एकूण १,५०,०२०/- रु. चा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला होता. तसेच संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी च अंमलदार यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखणेबाबत आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे नशाखोरी व अंमलीपदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत डी.ची. पथकाने पेट्रोलिंग व छापा कारवाईचे प्रमाण वाढवून दि. १०.०३.२०२५ रोजी पुन्हा कारवाई करीत एका संशयीताला अटक करुन त्याचेकडून ७५,०१०/- रु. किंमतीचा ०३ किलो वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला होता.सदर अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सातत्य राखत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोकों जावेद शेख व मोसीन टिनमेकर यांना दि. १३.०३.२०२५ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, दोन इसम हे नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करणेसाठी मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टी जवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ येणार आहेत, अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकास रवाना करून सदर इसमाचर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले.वरील प्रमाणे नमूद डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे रॉकेल डेपो झोपडपट्टी जवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ पंच, फोटोग्राफर यांचेसह जावून तेथे सापळा रचून वांचले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात पांढ-या रंगाची कापडी पिशवी घेवून दोन संशयित इसम येवून बांधले. त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यांना पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत त्यांचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्थाचा एकूण ६७,५१०/- रु. चा २ किलो ७०० ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्यांचेकडे कौशल्यापुर्ण तपास केला असता, सदर इसम हे अल्पवयीन धालके असल्याचे समजून आले. त्यांचेकडे अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचा तयार गांजामाल अजून एका अल्पवयीन बालकाकडून घेवून मिरज परीसरात किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे करीत आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने एक महीन्याचे कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून चौथी प्रभावी कारवाई केली आहे.महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडून ” नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी फायदेशीर कारवाई करुन नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राचविण्यात येत असून नागरीकांनी अंमली पदार्याबाबत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.सहा. पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट