मिरज शहरातील नामंकीत हॉस्पीटल्स मध्ये पेशंट म्हणून उपचाराचे बहाण्याने जावून ब्रँडेड कंपनीचे नळ चोरणारा चोरटा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून जेरबंद..

सह संपादक- रणजित मस्के
मिरज :-एकूण १२१५०/- रु. चे जॅग्वार व इतर कंपनीचे नग महागडे नळ जप्त.
पोलीस स्टेशन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
गु.घ.ता वेळ व ठिकाण
दि. ३०.०१.२०२५ रोजी ११.३० वा. जीवन चिल्ड्रन्स हॉस्पीटल, मिरज
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. ३९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) प्रमाणे
गु.दा.ता वेळ
दि. १८.०२.२०२४ रोजी २१.२४ वा
फिर्यादी नाव
सौरभ संजय दुर्गाड, वय २५, रा. दुर्गाडि मळा, मिरज
माहितीचा खोत
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली
मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चीक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेचल अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, पोलीस नाईक राहूल क्षीरसागर, नानासाहेब
चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर खोंद्रे, निवास माने सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक श्री अफरोज पठाण, पोकों कॅप्टन गुंडवाडे संशयित नाव व तेजस अनंत सावंत, वय ४०, रा. महाराष्ट्र हौसिंग सोसा., विजयनगर, सांगली पत्ता
जप्त मुद्देमाल
एकुण १२१५०/- रु. किंमतीचे जॅग्वार व इतर ब्रेडेड कंपनीचे महागडे १ नग नळ थ इतर साहीत्य
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली, मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेवाचत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले आहे.

सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी वअंमलदार यांना सुचित केले होते.
दि. १८.०२.२०२५ रोजी मिरज शहरातील जीवन चिल्ड्रन्स हॉस्पीटल, आय केअर हॉस्पीटल, आकाशदीप नेत्रालय, उषा हिमॉटॉलॉजी हॉस्पीटल, समर्थ न्यूरो हॉस्पीटल अशा मोठमोठ्या नामांकित हॉस्पीटल्स मधील वेगवेगळ्या ग्रैंडेड कंपनीचे महागडे नळ चोरीस गेले असलेबाबत पोलीस प्रशासनास माहीती मिव्यली होती. सदर चोरीच्या घटनेवावत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गु.र.नं. ३९/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तांत्रिक माहीती संकलीत करुन तिचे विश्लेषन करुन सदर चोरीचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद डी.ची. पथकाने तात्काळ कारवाई करीत सदर गुन्हयांचे घटनास्थळी जावून तेथील तांत्रिक माहीती संकलीत करुन सदर चोरीचे गुन्हयातील अज्ञात चोरट्याचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरु केले.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे डी.बी. पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे उपलब्ध तांत्रिक माहीतीवरुन अज्ञात चोरट्याचा मागोवा घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे तेजस सावंत हा वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ विक्री करणेसाठी मिरज येथील आण्णा भाऊ साठे पुतळ्यानजीक येणार असलेबाबत खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकास रवाना करुन सदर इसमास ताब्यात घेवून त्याचेवर योग्य ती कारवाई करणेचे आदेश दिले.
वरील प्रमाणे नमूद डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले वातमीप्रमाणे पंचांसह
जावून तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी हातात पिशवी घेवून एक संशयित इसम येवून थांबला. त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे तेजस अनंत सावंत, वय ४०, रा. महाराष्ट्र हौसिंग सोसा., विजयनगर, सांगली याचेकडून एकूण १२१५०/- रु. किंमतीचे वेगवेगळ्या ब्रेडेड कंपनीचे महागडे नळ व इतर साहीत्य जप्त केले असून त्याचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता, तो मोठमोठ्या नामांकीत हॉस्पीटल्स मध्ये पेशंट म्हणून उपचाराचे बहाण्याने जावून तेथील बाथरुमचील वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे महागडे नळ चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे करीत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुध्दे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करुन त्यांचा बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी मालमत्तेविरुध्दच्या गुन्हयाचाबत गाहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com