मिरज ग्रामीण पोलीस ठाणेची रेकॉर्डवरील आरोपी सागर हणमंत पाटील यांचेवर सांगली जिल्हातुन १ वर्षे कालावधीची हद्दपारीची कारवाई..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :- मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
सागर हणमंत पाटील, वय २१ वर्षे, धंदा शेती, रा. भवानी मंदिराचे मागे, सोनी, ता. मिरज जि. सांगली.
संपुर्ण सांगली जिल्हा हद्दीतुन दि. ३१/१०/२०२४ रोजी पासुन एक वर्षाकरीता हद्दपार
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्री भैरु तळेकर, सहा.पो.नि. श्री रणजीत तिप्पे, पोलीस अंमलदार शशिकांत जाधव, हेमंतकुमार ओमासे, सचिन मोरे, विकास भोसले, सुहास कुंभार.
मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सारे, मा. अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर मॅडम यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी व सराईत गुन्हे करणारे गुंड प्रवृत्तीचे आरोपींचेविरुध्द हददपारीचे जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करुन सादर करणेबाबत सुचित केले होते.

त्याप्रमाणे श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील अभीलेखावरील गुन्हेगार सागर हणमंत पाटील, रा. भवानी मंदिराचे मागे, सोनी, ता. मिरज जि. सांगली याचेवर मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस गंभीर स्वरुपाचे एकुण २ गुन्हे व संजयनगर पोलीस ठाणेस गंभीर स्वरुपाचा १ गुन्हा दाखल असलेने व व इतर परीसरामध्ये कुप्रसिध्द गुंड म्हणुन लोकांचे चर्चेत असुन तो लोकांना विनाकारण त्रास देणे, मारामारी करणे, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाच करुन दंगा करणे अशी कृत्ये त्याचेकडुन चालु होती. त्याचेवर वेळीच कायदयाचे बंधन रहावे याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ), (ब) प्रमाणे मा. भैरु तळेकर, पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव तयार करुन, सदर प्रस्तावाची मा. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग, मिरज यांनी सखोल चौकशी करुन प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक साो, सांगली यांचे कार्यालयाकडे सादर करुन त्यांचे मार्फतीने श्री उत्तम दिघे, उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांचे कार्यालयाकडे सादर करणेत आला होता. सदर प्रस्तावाची सुनावणी होवुन सागर हणमंत पाटील, रा. भवानी मंदिराचे मागे, सोनी, ता. मिरज जि. सांगली यास सांगली हद्दीतुन १ वर्षाकरीता हद्दपार करणेत आलेले आहे.
सदरची कारवाई मा. संदिप घुगे, पोलीस अधिक्षक, सांगली, मा. रितु खोखर मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक, सांगली, मा. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज यांचे मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. भैरु तळेकर, सपोनि श्री रणजीत तिप्पे, पोलीस अंमलदार शशिकांत जाधव, हेमंतकुमार ओमासे, सचिन मोरे, विकास भोसले, सुहास कुंभार यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com