अल्पवयीन बालकांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेले किंमती- 73,200/-रु. चे सोन्या-चांदीचे दागीने गोंदिया पोलीसानी केले हस्तगत

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

✅ 24 तासात घरफोडीचा गुन्हयाचा उलगडा — गोंदिया शहर डी. बी. पथकाची कामगीरी-➖

✅ फिर्यादी सौ.शालु मिथलेश कोसरकर, रा. जनता कॉलोनी गोंदिया यांच्या घरुन अज्ञात चोरट्याने दि.16/01/25 रोजी दुपारी 03.00 वा. ते 03.30 वाजता दरम्यान घराच्या समोरच्या दाराचा कुलुप तोडून घरात प्रवेश करुन सोन्या-चांदीचे दागीने एकुण किं. 73,200/- रु. चा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारी वरुन गोंदिया शहर पोलीस ठाणेस दि.16/01/2025 रोजी अप.क्र. 27/2025 क. कलम 331(3),305 भा.न्या.सं. अन्वये अज्ञात विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात डी. बी. पथकातील पोलीस अंमलदार करीत असताना दि.17/01/2025 रोजी पथकास एक इसम हा मुख्य पोस्ट ऑफीस समोर गोंदिया परीसरात सोन्या-चांदीचे दागीने विकण्यास आलेला आहे अशी गोपनिय खबर मिळाल्याने नमूद इसम एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेले दागिणे- एक सोन्याची चैन, एक सोन्याची लेडीज अंगुठी, एक सोन्याची लहान अंगुठी, एक जोड सोन्याचे कानाचे टॉप्स, एक सोन्याचा मंगळसुत्र, एक सोन्याची नथ, एक जोड चांदीची पैरपट्टी असा एकुण- 73,200/- रुपयांचा गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्येमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे….इसम हा अल्पवयीन बालक असल्याने त्यास त्याच्या पालकाच्या स्वाधिन करण्यात आले आहे….

नमूद गुन्ह्यातील चोरटा व मुद्देमालाचा अत्यंत तत्परतेने शोध घेवून डी. बी. पथकाने 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन प्रशंसनीय कामगीरी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. सतिश शेंडे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, यांचे निर्देश सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते, डी.बी. पथकाच पो.हवा. सतिश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट