सैन्य दलातील जवानाचे घरफोडी करून १६ तोळे सोने चोरणारा अमरजीत शर्मा यास वानवडी पोलीसानी ठोकल्या बेडया..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दाखल CR NO 107/2025 U/S- 331(4), 305, 317(2) फिर्यादी नामे के. एम. वादीवेल्लू वय – 35 वर्षे, नोकरी (सैन्य दलात हवालदार) रा – पी -29/3, पहिला मजला, ए. आय. सी. टी.एस. वानवडी पुणे यांनी त्यांच्या घरातील ते कर्तव्यावर असताना व पत्नी बाहेर गेली असताना घरफोडी करून 210 ग्रॅम (21 तोळे ) सोने चोरीस गेल्याची तक्रार दिली होती.

सदर गुण्याचा तपास आम्ही हाती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीचे वानवडी कॅन्टोन्मेंट, कोंढवा, गोळीबार मैदान, स्वारगेट, मंगळवार पेठ, खडकी, बंड गार्डन, पुणे स्टेशन विमान नगर अशा ठिकाणचे 50 पेक्षा जास्त फुटेज जप्त केले. आरोपीचे लोकेशन lat long वरून डम्प ची माहिती प्राप्त केली. तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपी वापरत असलेला मोबाईल क्रमांकाची माहिती प्राप्त केली व त्याचा मोबाईल क्रमांक याचा SDR प्राप्त केला. आरोपीच्या SDR मध्ये आरोपीचे नाव – अमरजीत विनोद कुमार शर्मा, वय – 30 वर्षे रा. गाव – बघेल, तालुका – बदसर, जिल्हा – हमिरपूर राज्य – हिमाचल प्रदेश असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मोबाईलचा CDR प्राप्त केला असता गुन्हा घडलेल्या वेळी आरोपीचे लोकेशन जुळले. आरोपी व वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन प्राप्त केले असता ते अंबाला व उत्तर भारतात दिल्ली, जोधपु असे वेळोवेळी बदललेले माहिती प्राप्त झाली. दिनांक 29/03/2025 रोजी आरोपी अमरजीत याचे लोकेशन बेंगलोर येथे आले. तात्काळ बेंगलोर येथे जाण्याची तयारी करून खाजगी वाहनाने रवाना झालो. तेवढ्यात दिनांक 30/03/2025 रोजी आरोपीचे लोकेशन बेळगाव येथे प्राप्त झाले. तात्काळ आरोपी बेळगाव येथे आल्याचे लोकेशन मिळताच बेळगाव कडे वळून रात्री 11.30 वाजता बेळगाव येथे पोहोचलो. आरोपी बेळगाव मधून निघून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना बेळगाव मधील खाजगी बस स्टैंड वर सर्व खाजगी बसेसचे नंबर घेऊन त्यांच्या पाटलाग करून पहाटे 04.30 वाजता सर्व बस साताऱ्याजवळ अडवून चेक केले असता पाहिजे आरोपी अमरजीत मिळून आला. आरोपीस सातारा जिल्ह्यात नजीकच्या पोलिस ठाणे खंडाळा येथे स्टेशन डायरी नोंद करून ताब्यात घेतले व कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुण्यात अटक केली. सलग तपास करण्याकरिता माननीय न्यायालयास विनंती करून 7 दिवस पोलीस कस्टडी घेतली. वर नमूद गुण्यातील चोरलेले सोने आरोपीने दिल्ली, हिमाचल प्रदेश येथे विकले व काही सोने गहाण ठेवले होते. गुण्यात चोरीस गेलेले 162 gm(16.2 तोळे ) सोने दिल्ली, हिमाचल प्रदेश येथून रिकव्हर केले.
आदरणीय सर आपल्यासह सर्व वरिष्ठांनी पर राज्यात तपास करणे बाबत योग्य मार्गदर्शन केल्याने सदरचा गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक गुन्हा ओपन करून भारतीय सैन्य दलातील जवानांचे चोरलेले 16.2 तोळे सोनू जप्त केले. आम्ही वानवडी तपास पथक यांनी केलेल्या करावाई बाबत Chief of Southern Command Army – left. General Dhiraj Shett यांनी मेरा पुणे पोलीस के ऊपर भरोसा बड गया, मै आप टीम का मेरे ऑफिस मे सम्मान करुंगा.. असे पुणे पोलिसांबद्दल गौरव उद्गार काढले.
सर्व कारवाईबद्दल उदय रोजी प्रेस नोट देत आहोत.
माहितीस्तव सादर
धनाजी टोणे
पोलीस उपनिरीक्षक
वानवडी तपास पथक