चालती ट्रेन पकडणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण…!
उपसंपादक – रणजित मस्के
नालासोपारा : वसई रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री चालती ट्रेन पकडताना तोल जाऊन पडलेल्या प्रवाशाचे प्राण रेल्वे पोलिसाने वाचविल्याची घटना घडली आहे.

पोलिस शिपाई ठाणांबीर हे बुधवारी रात्रपाळीत वसई रोड रेल्वे स्टेशनवर कर्तव्यावर असताना गस्त करीत होते. रात्री ११.३६ च्या सुमारास फलाट क्र. २ ए वर विरारला जाणारी लोकल ट्रेन आली होती. यावेळी एक प्रवासी ट्रेन चालू झाली असता ती पकडण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल जाऊन खाली पडले. ट्रेन व फलाटामधील गॅपमध्ये जाऊ लागले.
ही बाब लक्षात पोलिस शिपाई ठाणांबीर यांनी तत्काळ धावत जाऊन प्रवाशाला पकडून बाहेर ओढले व त्यांचे प्राण वाचवले. या प्रवाशाकडे चौकशी केल्यावर त्यांचे नाव विजय वसंतराव मळेकर (७४) असे आहे, अशी माहिती वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com