एमआयडीसी पोलीसांनी सिंधी कॉलनी परीसरातुन मोटार सायकल चोरी करणारी टोळी अवघ्या २४ तासात केली जेरबंद..

0
Spread the love

जळगाव

सह संपादक – रणजित मस्के

तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा वय 24 वर्ष रा, केमीस्ट भवन जळगाव यांनी फिर्याद दिली की, दिनांक 30/03/2025 रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ जळगाव येथे मंदीरात सीबी झेड मो.सा क्र. एम.एच. 19 बीए 1737 ही रात्री 08.00 वा लावुन मंदीरात निघुन गेला होता. 09.00 वाजता फिर्यादी हे मोसा लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना सदर ठिकाणी मोसा लावलेली दिसुन आली नाही. त्यांनी सदर मोसा चा शोध घेतला असता सदर मोसा ही कोठेच मिळुन न आल्याने दिनांक 31/03/2025 रोजी मोस चोरी गेल्याबाबत फिर्याद दिली असुन गुन्हा रजिस्टर नंबर 248/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव जिल्हयामध्ये तसेच एमआयडीसी पोस्टे हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो, यांनी चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे मा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो, पोलीस निरीक्षक संदीप पाटील सो, यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचन दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी पोउपनि राहुल तायडे, चंद्रकात धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, पोका किरण पाटील, नाना तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर अशांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन दोन ईसम हे सीबी झेड मोटार सायकल काढतांना दिसले. त्याप्रमाणे दोन पथके तयार करून शोध घेण्यास सुचना दिल्या. शोध घेत असतांना शनीपेठ पोस्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा सदर मोसा काढतांना दिसुन आल्याने त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्यास अटक करुन त्याचे सोबत असलेल्या साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे सोबत माधव श्रावण बोराडे हा असल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपीतांना अटक केली असुन त्यांचे कडुन 80,000/-रुपये किंमतीची सीबी झेड मो.सा क्र. एम.एच. 19 बीए 1737 आणी जळगाव शहर पोस्टे गुरनं. 128/2025 बीएनएस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हयातील 60,000/- रुपये किंमतीची हीरो कंपनीची एचएफ डीलक्स मोसा क्र. एमएच 19 बीटी 6945 अंशा एकुण 140,000/- रुपये किंमतीच्या दोन मोसा हस्तगत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट