एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी घरफोडी व बॅटरी चोरी मधील गुन्हेगार यांना अटक करुन ३,५५,५०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सोलापूर: मा. पोलीस आयुक्त श्री. डॉ. राजेंद्र माने सो. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ) श्री. विजय कबाडे सोो. व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग ०१ श्री संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजन माने व सपोनि/रोहीत चौधरी यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत वाढते घरफोडी व बॅटरी चोरीचे प्रमाण लक्षात घेता घरफोडी करणारे आरोपीचा यांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत शोध घेवुन आरोपी नामे दिपक वैकुंठ श्रीगण रा. घर नं.१९७ भारत नगर हैद्राबाद रोड जुना विडी घरकुल, सोलापुर तसेच आरोपी नामे मल्लेश गोपी म्हेत्रे रा. ३/२० बापुजी नगर, सोलापुर यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ६६७/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३८०
२) एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.६९७/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८०
३) एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ०१/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८०
४) एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.१४/२०२३ भादवि कलम ३७९
असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणुन रक्कम रुपये ३,५५,५०० /- रुपये चा मुद्देमाल आरोपी नामे..
०१) दिपक वैकुंठ श्रीगणेश रा. १९७ भारत नगर हैद्राबाद रोड, जुना विडी घरकुल सोलापुर तसेच
२) मल्लेश गोपी म्हेत्रे रा.२/३० बापुजी नगर, सोलापुर याच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री डॉ. राजेंद्र माने सो., पोलीस उप-आयुक्त श्री. विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजन माने तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत चौधरी, पोहेकॉ/१२७ राकेश पाटील, पोहेकॉ / २७५ चेतन रुपनर, पोहेकॉ / १२६६ सचिन भांगे, पोना/२७३ मंगेश गायकवाड, पोकॉ/ १०५९ सचिन जाधव, पोकॉ/१४६७ शैलेश स्वामी, पोकॉ/१६६४ अमोल यादव, पोकों/ १४८३ काशीनाथ वाघे, पोकॉ/१५८७ शंकर याळगी, पोकॉ/४३२ अश्रुभान दुधाळ, पोकॉ/ १७४८ संदीप जावीर यांनी बजावली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट