वरंध-कुंभार कोंड येथून विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:-
महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाड शहरातील घरफोडी चोरीची घटना ताजी असतानाच चोरांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे दिसत आहे. सविस्तर माहिती अशी की महाड तालुक्यातील तालुक्यातील वरंध कुंभारकोंड येथील बाळकृष्ण विजय धनावडे यांच्या शेतातील लोखंडी पोलावरील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यानी लंपास केला आहे. 23 डिसेंबर रोजी चोरीची घटना घडल्याची माहिती मिळाली असून मागील काही महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशाच प्रकारची चोरी करताना एका चोराला विजेचा करंट लागला व यामध्ये त्याचा जळून खाक होऊन मृत्यू झाला होता. दिलेल्या फिर्यादीनुसार 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरला असून यामध्ये 100 किलो तांब्याची तार व 40 लिटर ऑइल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असून या अज्ञात चोरट्याने विरोधात भारतीय विद्युत अधिनियम 2003 , कलम 136 प्रमाणे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वरील संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com