एम एच बी पोलीस ठाणे यांनी ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळीस ठोकल्या बेड्या….

उपसंपादक -रणजित मस्के
बोरिवली:– थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 24/1/2023 रोजी फिर्यादी श्री अजय कुमार अभिमन्यू यादव वय 38 वर्ष यांनी त्यांची ऑटो रिक्षा MH 47 C 3323 ही कॅन्सर हॉस्पिटल, दहिसर पश्चिम, मुंबई येथे पार्क करून जेवण करणे कामी गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची ऑटो रिक्षा चोरी केल्यावरून एम.एच.बी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद क्रमांक Cr 46/2023, कलम 379 IPC अन्वये नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सुर्यकांत पवार व पथक यांनी सीसीटीव्हीटीची पाहणी केली असता सदरची ऑटो रिक्षा ही वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गे जोगेश्वरी च्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्याच्या पुढे नमूद ऑटो रिक्षा बाबत कोणत्याही प्रकारे माहिती मिळूून आली नाही.
त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुडाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि गुुन्हे सचिन शिंदे,सपोनि पवार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील इतर ठिकाणी झालेल्या ऑटो रिक्षा चोरी मधील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीत इसमांचा शोध घेतला असता आरोपीत इसम हे चारकोप परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून चारकोप येथील पुजा बिल्डिंंग व हिंदुुस्थान नाका येथील रिक्षा स्टॅन्ड वर पोलीस पथकातील पो.शि.क्रं 140340/मोरे व पो.शि.क्रं 111518/सवळी यांनी रिक्षाचालक बनून सलग 3 दिवस पाहणी केली असता सीसीटीव्ही मध्ये दिसणारे आरोपीत इसम दिनांक 21/02/2023 रोजी दुपारी 12.00 वा.दरम्यान रिक्षा चोरी करण्याकरीता जात असताना पो.शि.क्रं 111518/सवळी यांच्या निदर्शनास दिसून आले. त्यावेेळी नमूद आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी नवघर पोलीस ठाणे,भाईंदर,कांदिवली पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे तसेेच एम.एच.बी पोलीस ठाणे हद्दीतूून ऑटो रिक्षा चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
नमुद आरोपीताना अटक करण्यात आले असून मा.महानगर दंडाधिकारी ळ, 68 वे न्यायालय, मुंबई यांचे समक्ष रिमांड कामी हजर केले असता मा.न्यायालयाने 24/02/23 पर्यंत PC दिलेली आहे.
अटक आरोपी नाव व पत्ता
आ.क्रं 1) अब्दुल अब्दुल अजीज मोमीन वय 35 वर्ष रा.ठि:- इस्लाम कंपाऊंड, एमजी रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई

आ.क्रं 2) भूषण लिंगपल्ली उर्फ शैलेश लिंगमपल्ली वय 46 रा.ठि=- आंबेडकर चाळ,रेणुका नगर,कांदिवली पश्चिम, मुंबई

गुन्हे अभिलेख आ.क्रं 1
कांदिवली पोलीस ठाणे
1) 333/2008 कलम 376,342, 506 भादवि
2) 435/2019, कलम 392 भादवी
3) 93/2020, कलम 379 भादवी
4) 71/2022, कलम 122 मपोका
5) 85/2022 ,कलम 8 12 पोस्को
चारकोप पोलीस ठाणे
6) 73/2008 ,कलम 379 भादवी
मालाड पोलीस ठाणे
8) 548/2007, कलम 379,34
9) 430/2007, कलम 379,34 भादवी
10) 552/2007, कलम 420, 34
11) 533/2007, कलम 379,34 भादवी
12)292/2007, कलम 379,34
13) 553/ 2007, कलम 379,34
उघडकीस आलेले गुन्हे
MHB Police Stn
1) 46/2023, कलम 379,34 IPC
( रिक्षा हस्तगत )
2) 869/2022, कलम 379,34 IPC
( रिक्षा हस्तगत )
जुहू पोलीस ठाणे
3) 845/2022 कलम 379 भादवी
( रिक्षा हस्तगत )
नवघर पोलीस ठाणे,मिरा भाईंदर
4) 132/2023,कलम 379 भादवी
तपासी पथक:-
पो नि सचिन शिंदे
सपोनि सूर्यकांत पवार
पो.ह.क्रं 980725/ खोत
पो.शि.क्रं 140240/ मोरे
पो.शि.क्रं 111518/ सवळी
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com