एम एच बी कॉलनी पोलीसांनी कन्स्ट्रक्शन मालाचा अपहार करून परराज्यात विक्री करणाऱ्या ४ इसमाना अटक करून १३ लाख रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत….

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :- एम एच बी कॉलनी पोलिस ठाणे , गु र क्र ५५७/२०२३ कलम ४०६,४२०,४११,३४ भादवी
➡️ थोडक्यात हकीकत दिनांक 20/10/2023 रोजी रात्री 08.30 वाजता ते दिनांक 21/10/2023 रोजी रात्री 08.00 वाजताच्या दरम्यान कोलते पाटील ग्रुप, नवागाव, दहिसर पश्चिम, मुंबई या ठिकाणी फिर्यादी यांच्या टाटा कंपनीच्या टेम्पो क्रमांक एम.एच. 47 वाय. 4519 यामध्ये भरण्यात आलेला कन्स्ट्रक्शन मटेरियल असलेल्या सुमारे तीन लाख रुपये किंमतीचा माल हा बाणेर पुणे येथे घेऊन जाण्यासाठी टेम्पोवरील चालक गुलरेज गुलाम रसुल अहमद, वय 23 वर्षे याच्या ताब्यात विश्वासाने सोपविला असता त्याने सदरचा माल टेम्पोमधून कोठेतरी अज्ञात स्थळी उतरवून त्याचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणुक केली व माझा टेम्पो कळंबोली हायवे पार्कींग, कळंबोली, पनवेली या ठिकाणी सोडून निघून गेला म्हणून सदरचा गुन्हा नोंद आहे.
➡️ फिर्यादी श्री इम्रान बाबुमियाँ अत्तार, वय- 29 वर्षे, धंदा- व्यवसाय, रा.डी.- गंगाराम चाळ, विकास बाडी, नेटीव्हीटी चर्चसमोर, हनुमाननगर, कांदिवली पूर्व, मुंबई.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ट पोलिस सुधीर कुडाळकर यांनी पो ऊ नि डॉ दिपक हिंडे व सोबत पथक नेमून तत्काळ गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत व मालमत्ता हस्तगत करणेबाबत सूचना दिल्या.
➡️ तपास
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पो ऊ नि डॉ दिपक हिंडे यांनी फिर्यादी यांचे गाडीचे जी पी एस लोकेशन शोधले असता ते मांडाला , मानखुर्द, घाटकोपर लिंक रोड या परिसरात मिळून आले . सदर ठिकाणी फिर्यादी यांची गाडी शोधली असता ती मिळून आली, सदर परिसरात सी सी टी व्ही फुटेजचा शोध घेऊन सदर सी सी टी व्ही फुटेज घाटकोपर लिंक रोड,मानखुर्द ते शीळ फाटा , उत्तरशिव, जि ठाणे असे सुमारे १२ तास सतत पाहून आरोपि यांनी गाडीतिल मुद्देमाल ज्या ठिकाणी विकला त्या ठिकानपर्यंत पाहून तसेच गोपनीय माहिती व तांत्रिक मदत घेऊन नमूद गुन्ह्यात चार आरोपी यांना अटक केली असून गुन्ह्यातिल सर्व मालमत्ता व फिर्यादी यांचा ट्रक हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्यातिल आरोपी हे ट्रक मालकांचा विश्वास संपादन करून सदरचा माल पर राज्यात विकण्याच्या तयारीत असण्यापूर्वी त्यांना अटक केली आहे.




➡️ हस्तगत मुद्देमाल
गुन्ह्यातील सर्व १००% मुद्देमाल हस्तगत मालमत्ता कन्स्ट्रक्शन मटेरियल साठी लागणारे जॅक मुंडे हा कच्चा माल (लोखंडी पाइप ) एकूण नग २२५, किमत अंदाजे ३,००,०००/- रुपये व एक ट्रक किमत अंदाजे १० लाख अशी एकूण १३ लाख रुपये
➡️ अटक आरोपी
१) अब्दुल नईम कयुम कुरेशी वय ३७ वर्ष, व्यवसाय- वाहनचालक, रा. ठी. कमलानगर ,डंपिंग रोड, बेंगणवाडी, गोवंडी, मुंबई,
२) शेर आली सैफूला शेख , वय २९ वर्ष, व्यवसाय- भंगार खरेदी विक्री, रा ठी कमलानगर ,डंपिंग रोड, बेंगणवाडी, गोवंडी, मुंबई,
३) मोहम्मद अली नबीजान शेख, वय २७ वर्ष, व्यवसाय- भंगार खरेदी विक्री व्यवसाय- भंगार खरेदी विक्री, रा ठी कमलानगर ,डंपिंग रोड, बेंगणवाडी, गोवंडी, मुंबई,
४) मुस्ताक शौकत शेख,वय ३८ वर्ष, व्यवसाय- भंगार खरेदी विक्री, रा ठी रूम नं ४०६, ४ था माळा , पाकीजय टॉवर, कौसा,कबरस्थान , मुंब्रा ,ठाणे,
सदर गुन्ह्याचा तपास श्री अजयकुमार बन्सल परिमंडळ ११, स पो आ धरणेंद्र कांबळे यांचे मार्गर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली.
➡️ तपास पथक
पो नी गुन्हे सचिन शिंदे
पो ऊ नि डॉ दिपक हिंडे,
पो ऊ नी निलेश पाटील,
पो शी अनंत शिरसाट,
पो शी प्रदीप घोडके यांनी केला
अशी माहिती श्री सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे
मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com