एम एच बी.काॅलनी पोलीसांनी एका १० वर्षीय मुलीच्या आग्रहास्तव केला आगळावेगळा वाढदिवस साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :- एक दहा वर्षाची काव्या हिने आपल्या वडिलांकडे अशी इच्छा प्रकट केली होती की तिचा आजचा म्हणजेच दिनांक 27 सप्टेंबर 2023 चा वाढदिवस तिला एम एच बी पोलीस ठाणे मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये साजरा करायचा आहे .

मुलीच्या अशा आगळ्यावेगळ्या आग्रहाची मागणी वडील श्री तेजस विखारे यांनी एम.एच बी . पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या मुलीची इच्छा प्रदर्शित केली.
या आग्रहाखातर कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या विनंतीला मान देऊन दहा वर्षाच्या मुलीसाठी स्वतःच वाढदिवसाचा केक, गुलाबाच्या बुके व चॉकलेट भेट देऊन त्या मुलीचा पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या सोबत ड्युटी ऑफिसर यांच्या दालनात वाढदिवस साजरा केला .
सदरचा वाढदिवस साजरा झाल्यावर काव्या खूप आनंदी दिसत होती व तिने व तिच्या वडिलांनी आजचा बर्थडे तुम्ही अवस्मरणीय व नेहमी लक्षात राहील असा साजरा केलेला आहे त्याबद्दल त्यांनी एम.एच.बी.काॅलनी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले .
यावेळी आपल्या मुलीची अनोखी इच्छा पुरी केल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहु लागले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com