एमएचबी काॅलनी पोलीसांची अति उल्लेखनीय कामगिरी.. हस्तगत केलेली मालमत्ता फिर्यादींना केली परत…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :-
एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे येथे
१) गुरु. १००३ / २०२२ कलम ३९२.३४ भा.द.वि
२) गुरक ८४३ / २०२२ कलम ३९२.३४ भादवि
३) गुक ५२/२०२२ कलम ३९२.३४ भा.द.वि
४) गु.र.क ८६/२०२३ कलम ३८१ भा.द.वि या गुन्हयातील हस्तगत मालमत्ता फिर्यादी यांना परत दिलेबाबत कौतुकांचा वर्षाव होत आहे.

नमुद गुन्हयाच्या पुढील तपासाच्या अनुषंगाने मा. पोलीस उपायुक्त सो, परिमंडळ ११. मुंबई श्री अजयकुमार बंसल यांनी वैयक्तिक मार्गदर्शन व सुचना देवून, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक समिर कुडाळकर सो व पो.नि गुन्हे शिंदे सी. यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि अखिलेश बाँबे व पथकाने नमुद गुन्हयाचा सखोल तपास करून नमुद गुन्हयातील आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडुन नमुद गुन्हयातील खालील नमुद मालमत्ता हस्तगत करण्यात आली.



१) गुरुक ५२/२०२२ कलम ३९२.३४ भा.द.वि मधील मुद्देमाल एक सोन्याचे मंगळसुत्र वनज २५.७९६ ग्रॅम. किंमत अंदाजे ७२,०००/-
२) गु.र.क. १००३ /२०२२ कलम ३९२.३४ भा.द.वि मधील मुद्देमाल एक सोन्याचे मंगळसुत्र वनज १०.८२ ग्रॅम. किंमत अंदाजे ६०,०००/-
३) गुरक ८६/२०२३ कलम ३८१ भा.द.वि मधील मुद्देमाल एक सोन्याची लगड वजन ३० ग्रॅम किंमत अंदाजे १,५२,०००/- व एक सोन्याची लगड वजन २० ग्रॅम
किं अं. १,०८,०९५/-
४) गु.र.क ८४३/२०२२ कलम ३९२.३४ भादवि मधील मुद्देमाल एक सोन्याचे मंगळसुत्र वनज ११.१५३ ग्रॅम किंमत अंदाजे ३०,०००/-
वर नमुद हस्तगत मुद्देमाल हा मा पोलीस उपायुक्त सो. परिमंडळ ११. मुंबई यांच्या हस्ते नमुद गुन्हयातील फिर्यादी अनुकमे
१) फिर्यादी नामे श्रीमती निलीमा पारकर
२) फिर्यादी यांचे भाउ अमर जनार्दन पिंपळे
३) फिर्यादी यांचे मामा श्री संदिप अजय आदत
४) फिर्यादी श्रीमती सुनिता सुनिल तांबे यांचे ताब्यात देण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com