एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे हद्दीतील डेली नीड्स सुपर मार्केट, आय सी कॉलनी बोरीवली पश्चिम या दुकानाचा डीप फ्रीजर टेम्पो मध्ये टाकून चोरी करणाऱ्या आरोपींना 3 तासामध्ये पकडून गुन्हा उघडकीस आणले बाबत…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :-
➡️ एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु. र. क्र. 232/2023 कलम 379 भादवी
➡️ गुन्हा घडला दिनांक व वेळ 28/05/2023, रात्रीचे 02.00 वा. सुमारास
➡️ गुन्हा दाखल दिनांक व वेळ
28/05/23, 13.49 वा.
➡️ तक्रारदाराचे नाव व पत्ता-
श्री जयेश राघू पटेल, वय 43 वर्ष, धंदा किराणा दुकानदार, राठी 401 सद्गुरु सोसायटी एलटी रोड दहिसर पश्चिम मुंबई.
➡️ घटनास्थळ-
डेली नीड्स किराणा व बेकरी या नावाचे गाळा नंबर 5 व 6, रोजारियो बिल्डिंग, सिटीझन बँकेजवळ, आय सी कॉलनी, बोरवली पश्चिम,मुंबई. या दुकानासमोर.
➡️ हकीकत-
दिनांक 20/05/2023 रोजी रात्रीचे 02.00 वा. सुमारास वर नमूद घटनास्थळावरून दुकानाचे जुने वापरते ब्लू स्टार कंपनीचे डीप फ्रीजर तीन अनोळखी इसमानी एका टेम्पो पिकअप मधूनचोरी करून नेले.
➡️ तपास-
नमूद गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पो.उ.नि. अखिलेश बोंबे व पथक हे घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावरील डेली नीड्स या किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर फुटेज मध्ये दिनांक 28/05/ 2023 रोजी रात्री एका टेम्पो पिकप मधून तीन अनोळखी इसम आलेले दिसले व त्यांनी मिळून दुकाना समोरील डीपफ्रीजर हे त्यांच्या टेम्पो पिकअप मध्ये टाकले व ते निघून गेले. सदर टेम्पो पिकप चा नंबर सीसीटीव्ही फुटेज द्वारा प्राप्त करून नमूद नंबर चा तपशील मिळवून नमूद टेम्पो चालकाचा वसई येथे जाऊन शोध घेतला. त्याच्याकडे नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने माहिती दिली की, त्याला ऑनलाईन पोर्टर या ॲपद्वारे एक फ्रीजर बोरवली वरून नालासोपारा येथे नेण्यासाठी भाडे मिळाले म्हणून तो बोरवली येथील घटनास्थळी आला व तेथे दोन इसम त्याला भेटले व त्यांनी त्यास हा फ्रिजर हे त्याचे असून ते नालासोपारा येथे घेऊन जायचे असल्याचे सांगितल्याने त्याने त्यांना फ्रिजर उचलण्यास मदत केली. त्याने दिलेल्या माहितीवरून नमूद पाहिजे आरोपीतांचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला व त्यांचे लोकेशन प्राप्त करून नमूद टेम्पो चालकासह नालासोपारा पश्चिम जिल्हा पालघर येथे जाऊन पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी झालेला डीपफ्रीजर हस्तगत करून आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.


➡️ अटक आरोपी-
1) ओमाराम देवाराम रबारीयो ,वय 24 वर्ष, धंदा किराणा दुकानात कामगार. राठी नाकोडा बिल्डिंग, शॉप नंबर एक यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, नियर शांतीनगर बिल्डिंग, न्यू लिंक रोड नालासोपारा पश्चिम पालघर.
2) वोताराम भवरलाल मेगवाल, वय 25 वर्ष, धंदा किराणा दुकानात कामगार, राठी नाकोडा बिल्डिंग, शॉप नंबर एक यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, नियर शांतीनगर बिल्डिंग, न्यू लिंक रोड नालासोपारा पश्चिम पालघर.
➡️ अटक दिनांक 28/05/2023
➡️ हस्तगत मालमत्ता
1) जुने वापरते ब्लू स्टार कंपनीचे डीप फ्रिजर किंमत अंदाजे 1,25,000/-रुपये
2) 33 प्रकारचे आईस्क्रीमचे पाकीट किंमत अंदाजे 19,564/-रुपये
एकूण किंमत- 1,44,564/-
➡️ तपास पथक
पो.उ.नि. अखिलेश बोंबे
पो.उ.नि संदीप गोरडे (IO)
पो.ह.990320/ प्रवीण जोपळे
पो.ह.050564/ संदीप परीट
पो.शि. 080461/ अर्जुन आहेर
केपो.शि. 130229/ गणेश शेरमाळे यानी सुधीर कुडाळकर )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com