पोस्को गुन्ह्यातील पळून गेलेल्या आरोपीतास उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेण्यात एमएचबी काॅलनी पोलीसांना यश…

प्रतिनिधी- विजय परमार
बोरीवली :-➡️ पोलीस ठाणे- एम एच बी कॉलनी, पो ठाणे, मुंबई
➡️ गु.र.क्रमांक – 507/2024 कलम 74 भा.न्या.स. सह कलम 8, 12 पोस्को अधिनियम.
➡️ फिर्यादी:- श्रीमती अर्चना राजेश कनोजीया, वय 32 वर्षे, धंदा गृहिणी, रा ठी- डिसिल्वा चाळ, संतोषी माता रोड, दहिसर नदीकिनारा, दहिसर पश्चिम, मुंबई
➡️ थोडक्यात हकीकत :- दिनांक 25/08/2024 रोजी रात्री 11:00 वाजेसुमारास फिर्यादी यांची मुलगी, वय 13 वर्षे 07 महिने ही त्यांच्या राहते घर परिसरातील जनरल स्टोअर्स मधून साहित्य घेऊन येत असताना, आरोपी नामे जिशान याने फिर्यादीच्या घरासमोरील कॉर्नरवर बळीत मुलीला हाक मारून तिच्या छातीला डाव्या हाताने स्पर्श करून व उजव्या हाताने तिच्या कमरेला मिठी मारली म्हणून गुन्हा नोंद.
➡️ तपास – सदर गुन्ह्याची बाब गांभीर्याने घेऊन त्या अनुषंगाने गुन्हे प्रगटीकरण अधिकारी पो उप नि संदीप गोरडे व पथक यांनी पाहिजे आरोपीताविषयी परिसरात माहिती प्राप्त केली असता तो गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपीकडे मोबाइल नसल्याचे समजले. आरोपीचे गावाकडील बरेचशे लोक अँटॉप हिल या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना त्याने एक अनोळखी मो क्र वरून त्याच्या दहिसर येथे राहणाऱ्या भावास फोन केला व चुकीची माहिती दिली की तो बोरिवली परिसरातच आहे. सदर मोबाईल चे लोकेशन काढले असता ते नाशिकच्या पुढे असल्याचे दिसून आले त्यानंतर सलग आठ ते दहा मोबाईल लोकेशन काढले असता सदरचे लोकेशन हे रेल्वे रूळ परिसरातील दिसून आले. त्याच वेळी सदर परिसरातील सदर वेळेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेची माहिती घेतली असता उत्तरप्रदेशच्या दिशेने जाणारी रेल्वे असल्याचे समजले. तसेच आरोपीचे मूळ गाव हे प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे असल्याने, पाहिजे आरोपी गावी चालला आहे स्पष्ट झाले.
पो उप नि गोरडे यांनी सदरची माहिती मा.वरिष्ठांना देऊन मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून प्रयागराज येथे रवाना झाले. तसेच आरोपीच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता माहिती प्राप्त झाली की आरोपी हा त्याच्या मूळ गावी गेला आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेऊन व सापळा रचून आरोपीतास ग्राम दिबोही, प्रयागराज, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पाहिजे आरोपीतास पोलीस ठाणेस आणून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली.
➡️ अटक आरोपीचे नाव व पत्ता
मोहम्मद जिशान मोहम्मद मुस्लीम, वय 21 वर्षे, धंदा- बस क्लिनर, बंगाली चाळ, संभाजी नगर, लिंक रोड, दहिसर पूर्व, मुंबई.
➡️ अटक दिनांक व वेळ
28/08/2024, वेळ – 23.51 वा.
➡️ तपास पथक
पोलीस उपनिरीक्षक संदिप गोरडे
पो.ह.990320/ प्रवीण जोपळे
पो. शि. 080461/ अर्जुन आहेर
पो. शि. 100014/ आदित्य राणे (तांत्रिक मदत) यानी केला अशी माहिती श्री सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com