म्हसवड पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या सोलापुर जिल्ह्यातुन आवळल्या मुसक्या..
उपसंपादक- रणजित मस्के
सातारा :– म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील म्हसवड ता. माण गावातुन मोटार सायकली चोरीचे गुन्हे दाखल होते. सदर गुनद्यांतील आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सो, सातारा समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सोरे, सातारा, श्रीमती आँचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी सो, दहिवडी उप विभाग, श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्ह्यांचे तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत गोपनिय खबन्यामार्फत व तांत्रिक माहीतीचे आधारे आरोपी निष्पन्न केले.
दिनांक 17/05/2024 रोजी यातील आरोपीचा ठावठिकाणा मिळताच मा, वरिष्ठ अधिकारी साो यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सखाराम बिराजदार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सोलापूर जिल्ह्यांतील माळशिरस, अकलूजव इंदापुर बावडा येथे जावून आरोपी
१) राहुल वामन शिताप कोळी, रा. कचरेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर,
२) अजय उर्फ पद्या प्रकाश खरात, रा. कचरेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर, व
३) आकाश बाळु थोरात, रा. चाकण ता. खेड जि. पुणे सध्या रा. कोंडबावो ता. माळशिरस जि. पुणे ताब्यात घेवून आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी संगनमताने मासवड गावचे हद्दीतील दोन मोटार सायकल व पिलीव ता. माळशिरस गावचे हद्दीतल एक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांनी चोरी केलेल्या तीन मोटार सापकाली एकुण 1,00,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केरण्यात आला आहे.
आरोपी यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचे हद्दीतील दोन गाडया व पिलीव ता. माळशिरस येथून चोरी केलेली एक गाडी खालील प्रमाणे केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
म्हसवड पोलीस ठाणे
गुन्हा रजि. नंबर व कलम
. र. नं. 146/2024 भादविक 379 गु
गु. र. नं. 164/2024 भादयिक 379
मु. पो. पिलीव ता. माळशिरस येथून चोरी गेलेली गाडी
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अधीक्षक सोरे, सातारा, श्रीमती. आँचल दलाल, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, दहिवडी विभाग, दहिवडी श्रीमती अश्विनी शेंडगे, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे, व अमंलदार शहानी वाघमारे, शिवाजी जाधव, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, व धिरज कवडे यांनी केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
