गौरीशंकर कॉलेजचे समोरील रोडवर डीजेवर पिस्टल व तलवारी हातात घेऊन नाचणा-या ५ आरोपींच्या वाई तपासपधकाने मुसक्या आवळून १ पिस्टल ३ जिवंत काडतुसे १ तलवार १ कोयता १ लोखंडी सुरा व दोन दुचाकीसह एकुण २,५३,१००/- रु. किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, सातारा तालुका गु.र.नं ५४२/२०२३ भा.द.वि.सं १८८ वैगरे मधील गौरीशंकर कॉलेज येथील सार्वजनिक रोडवर तु मोठा की, मी मोठा या वादातुन डीजेवर पिस्टल, तलवार, कोयते, सुरे हातात घेऊन नाचवुन दहशत निर्माण करणारे संशयित इसम हे पारगांव ता खंडाळा जि सातारा येथे वास्तव्यास आहेत.
सदरची बातमी प्राप्त होताच वाई तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा ३३१ अजित जाधव, पो. शि १४३५ प्रसाद दुदुस्कर, पो.शि ७९७ शिंदे पो.शि १२५५ राठोड यांस सदरच्या संशयित आरोपी यांना ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्याने, वाई पोलीस ठाणेचे तपास पथक पारगांव ता खंडाळा जि सातारा येथे रवाना होऊन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पारगांव येथील एका लॉजवर छापा मारुन लॉजमधील रुममधुन आरोपी नामे
१) अमन इस्माईल सय्यद रा बोपोडीं ता वाई जि सातारा
२) संग्राम प्रकाश शिर्क रा मू.पो म्हसवे ता जावली जि सातारा
३) यश धनाजी घाडगे रा मुईज जि सातारा
४) करण छगन जाधव रा शिवथर ता जि सातारा
५) दत्तात्रय आबा शिंदे रा शिंदेवाडी ता जि सातारा यांस ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन ०१ पिस्टल ०३ जिवंत काडतुसे ०१ तलवार ०१ कोयता, ०१ लोखंडी सुरा व ०२ दुचाकी वाहने असा एकुण २.५३,१००/- रु किंमतीचा
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
माहे नाव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण ७१ देशी बनावटीची पिस्टल/कडे १७८ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो श्री. समिर शेख, मा अप्पर पोलीस अधीक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस उप-निरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, पोलीस हवालदार ३३१ अजित जाधव पोलीस अंमलदार १४३५ प्रसाद दुदुस्कर, पो.शि ७९७ हेमंत शिंदे पो.शि १२५५ श्रावण राठोड, पो.शि ११४३ प्रेम शिर्के यांनी केली आहे.मा पोलीस अधिक्षक सो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com