समाजविघातक रफिक गैंग मधील सदस्य” यांना भंडारा पोलीसांनी केले २ वर्षाकरिता भंडारा जिल्ह्यातुन हद्दपार…

उपसंपादक-रणजित मस्के
भंडारा :-टोळी प्रमुख
1) रफिक निसार शेख वय 32 वर्ष रा. आंबेडकर वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा (गुन्हेगारी टोळीचा सदस्य)
2) रत्नदिप उर्फ कालु हेमराज माटे वय 41 वर्ष रा. जगनाडे नगर तुमसर ता.तुमसर, जि.भंडारा
3) भूपेंद्र मोहन गिलोरकर वय 32 वर्ष रा.हनुमान नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा
4) गौरव उर्फ विक्की क्रिष्णा राखडे वय 19 वर्ष रा. दुर्गा नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा
5) शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवार वय 29 वर्ष रा. कुंभारे वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा
6) मयूर उर्फ गप्पु रविकांत सांडेकर वय 22 वर्ष रा.देव्हाडी, ता.तुमसर, जि. भंडारा
7) मनोज देविदास कान्हेकर वय 37 वर्ष रा. कुंभारे वार्ड तुमसर, ता. तुमसर, जि.भंडारा) राकेश गंगाधर लांजेवार वय 29 वर्ष रा. नेहरु वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा ता. तुमसर, जि. भंडारा हे पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील तुमसर शहर येथील रहिवासी असुन ते गुंड व खुनसी प्रवृत्तीचे गुन्हेगार आहेत. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर सन 2015 पासून निविघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस ठाणे तुमसर येथे खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, गंभीर दुखापत, खंडणी, दरोड्याची पूर्व तयारी करणे. अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी गुंडागर्दी करुन संघटीत गुन्हेगारी टोळी अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.
अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात वरील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी पोलीस स्टेशन तुमसर परीसरातील दहशत पसरवित असल्याने पोलीस निरीक्षक पो.स्टे. तुमसर यांनी प्रस्ताव तयार केला. लोकसभा निवडणुक दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, भंडारा यांनी दिनांक 5/04/2024 रोजी गुन्हे अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रश्मिता राव एन, उपविभाग तुमसर यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.), तत्कालीन ठाणेदार श्री. निलेश ब्राम्हणे, व ठाणेदार नरेंद्र हिवरे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन तुमसर, सफौ. धर्मेद्र बोरकर, पो.हवा. राजेश पंचबुधे, पो.ना. अंकोश पुराम, पो.ना. मार्कड डोरले यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com