‘मेफोड्रोन (एम.डी.) इराणी वस्ती मधील एका महिलेकडुन पोलिसांनी केले जप्त

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि ३० कल्याण ठाणे
पोलीस उप आयुक्त परि. ०३, कल्याण यांचे खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत आबिवली परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर व अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे करीता प्रतिबंध गस्ती करीता पोलीस पथक रवाना झाले होते
पोलीस पथक दिनांक. ३०/०४/२०२५ रोजी १२.२० वा. चे सुमारास ९० फूट रोड, अटाळी कडुन आंबिवली कडे जाणारे कच्या रस्त्यावर कल्याण प. जि. ठाणे या ठिकाणी आले असता सदर ठिकाणी पोलीस पथकास रोडचे कडेला उभ्या असलेल्या स्कूटी क्रमांक एम.एच.०५ ईयु २८८७ या स्कुटीवरील महिलेच्या हालचाली संशयीत वाटल्या. तेंव्हा पोलीस पथकाने तिचा पंचासमक्ष अंगझडती पंचनामा करण्यात आला असता तिचे ताब्यातुन १) ५८ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम. डी.), अंमली पदार्थ. अं.कि.रु. १,१६,०००/- हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असुन सदर महिला नामे फिजा मनोज इराणी, वय २९ वर्षे रा. पाटीलनगर, इराणी वस्ती, आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ, ता. कल्याण जिल्हा ठाणे हिस अटक करण्यात आली असुन, सदर इराणी महीले विरूध्द खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं.३३८/२०२५, अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास चालु आहे.अटक इराणी महिलावर यापूर्वीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) खडकपाडा पो. ठाणे, गुर क. १४८/२०१९ कलम ३५३, ३३२, ३३३, २२४, २२५,
५०४,५०६(२), १४३, १४७, १४९ प्रमाणे
२) खडकपाडा पो. ठाणे, गु र क. ४२/२०२१ कलम ३५३, ३३२, ३३३, १४३, १४७,
१४४,१४८,२२४, २२५, ४२७ प्रमाणे
३) खडकपाडा पो. ठाणे, गु र क. ३८४/२०२३ कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे
४) कोळसेवाडी पो. ठाणे, गु.र.क्र. ४७६/२०१८ कलम ३९२, ३४ प्रमाणे
सदर कारवाई पो.नि. सबाजी नाईक नेम कोळसेवाडी पोलीस ठाणे, स.पो.नि.अनिल गायकवाड, स.पो.उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.हवा.३०९० सदाशिव देवरे, पो.शि.२३२३ अमित शिंदे, पो.शि. ७६५३ राहुल शिंदे, नेम. पोलीस उप आयुक्त. परि.०३, कल्याण विशेष कारवाई पथक व म.पो.शि.८३६९ सुनिता होडगर, म.पो.शि.५४३६ भावना भट ने. खडकपाडा पो. ठाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट