मीडिया वार्ता न्यूज आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मुंबईत संपन्न..

प्रतिनिधी-सचिन पवार
माणगांव:-सांताक्रूझमधील वाकोला वेल्फेअर असोसिएशनमध्ये पार पडला सोहळा, राज्यभरातील मान्यवरांची उपस्थिती मीडिया वार्ता न्यूज मार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार आज मुंबईत काल दिमाखात पार पडला.
सदर सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून RPI मुंबई प्रदेशाध्यक्ष मा. सिध्दार्थ कासारे, RPI सरचिटणीस मा. विवेक पवार, RPI अध्यक्ष श्री. साधू कटके, टायगर ग्रुपचे मा. संजय खंडागळे, प्रसिद्ध समाजसेविका माधुरी टेकाम, दैनिक मुंबई हलचल संस्थापक दिलशाद खान, बेटी बचावो, बेटी पढावो संस्थेचे अध्यक्ष मा. मनोज दुबे, रिॲलिटी क्वार्टरचे संस्थापक पवन सिंह चौहान यांची मुख्य उपस्थिती लाभली होती.

सांताक्रूझमधील वाकोला वेल्फेअर असोसिएशनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यभरातून राज्यभरातून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकिय, कला, क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रामध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने आदर्श बनलेल्या समजासेवकांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
संस्थापक आयु. भागुराम सावंत आणि सह संपादक मनोज खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पुरस्काराच्या दुसऱ्या वर्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर उपस्थित राहिले होते. शिवछत्रपती जयंतीनिमित्त काही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहितीपूर्ण भाषण केली, तर काही मान्यवरांनी सुंदर कविता सदर केल्या. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा सारख्या विभागातून आलेल्या समाजसेवकानी आपण करत असलेल्या समाजकार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. बेटी बचावो बेटी पढावो संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मनोज दुबे यांनी शिवाजी महाराजांच्या महीला सुरक्षा धोरणविषयी माहिती देवून उपस्थितीना मार्गदर्शन केले.
सोहळ्याच्या सुरुवातीला कालिना डान्स ग्रूपने शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी लोकगीतांवर सुंदर नृत्य सदर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
यावेळी मान्यवरांचे आणि समाजसेवकांचे स्वागत करताना मीडिया वार्ता वृत्तसमूहाचे संस्थापक भागुराम सावंत म्हणाले की, दैनिक वृत्तपत्र आणि डिजिटल न्यूज पोर्टलद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आमचे प्रतिनिधी पत्रकारीतेच्या जबाबदारीचे भान राखून समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत असून यापुढेही असे प्रामाणिक प्रयत्न आम्ही सदैव करत राहू असे मीडियावार्ता वाचकांना आम्ही आश्वासन देतो. समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या समाजसेवकांचा गौरव करण्याचे भाग्य आज आम्हाला लाभले, हा उपक्रम आम्ही दरवर्षी उत्साहाने आयोजित करू व महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातील समाजसेवकांचा गौरव करू अशी ग्वाही मी देतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार २०२४ वर्ष दुसरे या सोहळ्यासाठी महत्त्वाचे सहकार्य करणाऱ्या आरपीआय कालिना विधानसभा टीमचे विशेष आभार मानतो.
छत्रपति शिवाजी महाराज पुरस्कार सारख्या समाजपयोगी उपक्रमद्वारे समाज विकासासाठी कार्यरत असणाऱ्या गुनिजनांचा सत्कार केला केला जात असल्याने आमच्या मीडिया वार्ता न्यूजसाठी ही फार अभिमानाची बाब आहे, असे विधान मीडियावार्ताचे सिनियर रिपोर्टर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संतोष मोरे कार्यक्रमाची सांगता करताना केले. सदर सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यात मा. श्रावण मोरे, मा. विजय सकपाळ, मा. सचिन पवार, मा. संतोष मोरे, मा. शशिकांत कानाडे, मा. दयानंद सावंत, मा. मनोज खोब्रागडे, मा. त्रिशा राऊत, मा. यादव, मा. संदेश साळुंके, मा. नंदकुमार चांदोरकार, मा. पुरारकार यांचे विशेष सहकार्य लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com