मेढा पोलीस ठाणे, जि. सातारा यांची कारवाईएकीव याजवळ दरीमध्ये दोन इसमांना ढकलून देवून केलेल्या दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी अटकेत )

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक २६/७/२०२३ रोजी दुपारी ४.४५ वा.चे सुमारास एकीय ता. जावली जि.सातारा येथील – याचे जवळ दोन इसमांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना धबधब्याचे शेजारी दरीत ढकलून देवून त्यांचा खून केला असल्याचे दिले तक्रारीवरून मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ११४/२०२३ भा.दं.वि.सं.कलम २०२,३४ प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करणेत आलेला असून त्याचा पुढील तपास मेढा पोलीस करीत आहेत.

दुहेरी खुनाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा व श्री. बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमूद गुन्हा उघड करण्याच्या सूचना श्री. संतोष तासगांवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे यांना दिल्या होत्या त्यानुसार यापुर्वीच सदर गुन्ह्यातील ०३ आरोपींना अटक करून पुढे तपास सुरू होता परंतु सदर गुन्ह्यातील त्यांचा चौथा साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यामुळे त्याचा शोध घेणेबाबत मा. वरीष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्यानुसार सदर आरोपीचा पोलीस ठाणेचे खास पथक तयार करून गुप्त बातमीदारांचे मार्फतीने शोध घेत असताना काल दि.२५/७/२०१३ रोजी तो मिळून आल्याने त्यास सदर गुन्ह्याचे तपासात अटक करणेत आलेली असून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि श्री. संतोष तासगांवकर अधिक तपास करीत आहेत.

सदर कारवाईमध्ये श्री. समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचिम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष तासगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स.पो.फा. गंगावणे, पोशि/ सनी काळे, दिगंबर माने, सागर मोरे, सुरज बाघमळे यांनी सहभाग घेतला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट