एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच तो बनविण्यासाठी लागणारे केमीकल व इतर साधन सामग्री असा एकुण ०५,९४,६०,३००/- असा मुद्देमाल जप्त

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नाशिक

नाशिकरोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी मुंबई पोलीसांनी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये एम. डी. या अंमली पदार्थ बनविण्याची कारखान्यावर छापा टाकुन कारवाई केली होती. त्या नषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अंमली

पदार्थ विक्री करणारे, साठा करणारे यांच्या विरुध्द कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो, अंकुश शिंदे सो, नाशिक शहर यांच्या आदेशाने व मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेगावातील एम. आय. डी. सी. येथील असणाऱ्या छोटया मोठया केलीकल कंपन्या व गोडाउन यांच्याबाबत माहिती घेत असता शिंदे गाव येथील दत्तु वामन जाधव वय ५१ वर्षे धंदा-शेती रा. खर्जुल मळा, जुना ओढा रोड, नाशिकरोड यांच्याकडुन माहिती मिळाली कि इसम नामे श्री. संजय काळे नावाच्या व्यक्तीला शेतीसाठी लागणारी औषधे, रसायनांचा कच्चा माल ठेवण्यासाठी दरमहा ५ हजार रुपये प्रमाणे भाडेतत्वावर दिलेले होते. परंतु सध्या तो गाळा बंद असुन आत काय आहे बाबत शंका निर्माण झाल्याने त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे येथे संपर्क साधला.

नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी सदरची माहिती मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांना दिली असता डी.सी.पी. झोन २, मोनिका राउत मॅडम यांच्या आदेशांन्वये वपोनि / वांजळे, गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि / हेमंत फड व सोबत सपोनि / गणेश शेळके, सपोनि / सुवर्णा हांडोरे व गुन्हे शोध पथक असे शिंदे गाव एम. आय. डी. सी या ठिकाणी फॉरेंसिक टीम सह खान होउन छापा टाकला असता सदर ठिकाणी ४.८७० किलोग्रॅम वजनाचा (५,८४,४०,०००/-) किंमतीचा फिकट पिवळसर रंगाचा पावडर स्वरूपात असलेला मेफेड्रॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ १२,००० रुपये प्रति ग्रॅम किंमतीचा. एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळुन आला. तसेच सदर गोडाउन मधुन एम.डी. तयार करण्याचे केमीकल व इतर साधन सामग्री असा एकूण ०५,९४,६०,३००/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, पोनि चौधरी, सपोनि / हेमंत फड, सपोनि / गणेश शेळके, सपोनि / सुवर्णा हांडोरे, पोहवा / १६४८ शेख, पोअं/ २०७२ कोळी, पोना/ १८५१ पवार, पोशि/ १५४२ पोतन, पोशि/ ५४ पानसरे, पोशि/ २३८१ कासार, पोशि/ २२५५ जाधव, पोशि/२५५० नागरे, पोशि/ २०४ गाडेकर, पोशि/ २३६० शिंदे, पोशि/ पिंगळ यांनी कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट