मौजमजा करण्याकरीता महागड्या मोटर सायकली चोरी करुन त्या ऑनलाईन फंडा वापरुन विक्री करणा-यास पुणे युनिट ५ ने केले जेरबंद..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दि.०२/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथका कडील पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार व स्टाफ असे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांचे सुचना प्रमाणे व गोपनीय बातमीच्या आधारे संशयीत इसम नामे महादेव शिवाजी गरड, क्य २६ वर्षे, सध्या रा. समर्थ कृपा बिल्डींग, कल्याणी शाळेजवळ मांजरी बुगा पुणे. मुळ रा. मु. पो. अंबुलगा, ता. चाकुर, जि. लातुर यास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन होंडा सी.बी. शाईन मोटर सायकल क्रमांक MH-१५/GH/९१४८ व यूनिकॉर्न मोटर सायकल क्रमांक MH-११/CT/२९१४ अशा ०२ चोरीच्या मोटर सायकली जप्त करणेत आल्या. नमुद इसमाकडे कौशल्यपुर्वक तपास करता त्याने आणखीन काही होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटर सायकल चोरलेल्या असुन त्याचे मोबाईलचे फेसबुक अॅपमधील Marketplace या जाहिराती वरुन मोटर सायकलचे हफ्ते थकल्याने फायनान्स कंपनीने मोटर सायकली ओढल्या असल्याचे लोकांना खोटे कारण सांगुन विकल्या असल्याचे त्याने सांगितले.
त्यावरुन गोपनीय माहिती काढुन सबंधीत व्यक्तींकडे चौकशी करुन १२ यूनिकॉर्न मोटर सायकल व सदर इसमाच्या ताब्यातील ०२ मोटर सायकल असे एकुण १४ दुचाकी वाहने असा एकुण ८,४०,०००/-रु.किं. चा मुद्देमाल हस्तगत करुन १) हडपसर पोलीस स्टेशन कडील ०६, २) काळेपडळ पोलीस स्टेशन कडील ०३.३) चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनकडील ०२ व ४) सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन कडील ०३ असे एकुण १४ वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. इसम नामे महादेव शिवाजी गरड हा पदवीधर असुन त्याने मौजमजा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्याने दुचाकी वाहने चोरुन त्या लोकांना खोटे कारण सांगुन विकलेल्या आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर, पुणे शहर अति. कार्य. गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ५ गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे, पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार विनोद शिवले, प्रताप गायकवाड, विनोद निभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती तुपे, पल्लवी मोरे, तानाजी देशमुख, राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमर चव्हाण, नासिर देशमुख व नेत्रिका अडसुळ यांचे पथकाने केली आहे.