मस्तगड परिसरातील अनोळखी इसमाच्या खुन करणाऱ्या आरोपी शक्तीमान भोसलेस ५ तासात स्था. गुन्हे शाखा जालना यांनी केले जेरबंद..

सह संपादक -रणजित मस्के
जालना


दिनांक 10/07/2025 रोजी मयत अनोळखी पुरुषास अज्ञात आरोपीताने गळा आवळुन तसेच त्याचे डोक्यात जबर दुखापत करुन जिवानिशी ठार केले म्हणुन सरकारतर्फे फिर्यादी नामे आरती शेषराव जाधव, वय-35 वर्ष, व्यवसाय-नौकरी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कदिम जालना यांचे फिर्यादीवरुन दिनांक 10/07/2025 रोजी कदीम पोलीस ठाणे, जालना येथे गु.र.क्र.282/2025 कलम 103(1) भा.न्यां.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर अनोळखी मयताचा खून करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधिक्षक, जालना श्री. अजयकुमार बंसल यांनी श्री पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी पथक तयार केल्याने मारेकऱ्याचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हो फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपी नामे शक्तीमान ऊर्फ शक्ती अंकुश भोसले, व्यवसाय-भिक मागणे, वय-19 वर्ष, रा.देऊळगांवराजा, ता.देऊळगांवराजा, जि. बुलढाणा यास बस स्थानक परिसर, जालना येथुन ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन मयताने आरोपीतावर अनंगिक संबंध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आरोपीताने मयताच्या डोक्यात वीटकर मारुन जखमी करुन त्याचा कपडयाच्या सहाय्याने गळा आवळुन खुन केला व त्याठिकाणाहून पळुन गेला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, कैलास खाडे, सागर वाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिचोले, चापोशि सौरभ मुळे, स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.