जिल्हा परिषद पालघर येथे शहीद दिवस साजरा…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-आज दिनांक२३/३/२०२४ रोजी जिल्हा परिषद पालघर येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला.
शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे यांनी थोर क्रांतिवीर भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी या सर्वाना ब्रिटीश सरकारने लाहोर जेल मधे फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असतो.

यावेळी कृषी विकास अधिकारी, प्रकाश राठोड, पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. प्रकाश हसनाळकर,लेखा अधिकारी मनोज पवार तसेच जिल्हा परिषदे मधील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट