शहीद राहुल भगत यांच्या वडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या…

0
Spread the love

उपसंपादक -राकेश देशमुख

महाड :- महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथील रहिवाशी अनंत सिताराम भगत यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सीमेवर रक्षण करताना शहीद झालेले राहुल भगत यांचे वडील म्हणून अनंत भगत यांची ओळख होती.

६० वर्षीय अनंत भगत यांना दारूचे अति व्यसन होते,, दारूच्या अति सेवनामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अनंत भगत यांनी यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती देखील मिळत आहे.

आज सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये रशीच्या साह्याने अनंत भगत यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. अनंत भगत यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन व महाशक्ती असोसिएशन ॲम्बुलन्स दाखल झाली असून सदरचा मृत्यू देह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालया येथे पाठविण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय काळंगीरे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट