मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर, रोटरी क्लब ऑफ इंडिया या संस्थेमार्फत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व थॉयरॉईड तपासणी शिबीराचे आयोजन संपन्न…

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
आज दि.१५/०२/२०२५ रोजी सकाळी १०/३० या ते १३/३० वा चे दरम्यान मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे बी.जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पीटल, पुणे तसेच रोटरी क्लब ऑफ इंडिया कात्रज या संस्थेमार्फत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी तसेच थॉयराईड तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता अॅमानोरा येस फाऊडेशन कडुन आयोजक श्री. विवेक कुलकर्णी, ससुन हॉस्पीटल तर्फे डॉ. स्मिता मॅडम व त्यांची टीम त्याच बरोबर थॉयराईड चेकअप साठी डॉ. अपर्णा व त्यांची टीम असे वरील सर्वामार्फत शिबीर पार पडले. वरील शिबीरास पोलीस स्टेशन कडील सपोनि चेतन मोरे, सपोनि मदन सिसाळ, मसपोनि आश्विनी कटटे, मसपोनि आश्चिनी पाटील, पोउपनि सावन आवारे, पोउपनि सूर्य, पोउपनि जगताप, पोउपनि भापकर, मपोउपनि सुवर्णा पवार, तसेच गोपनीय विभागाचे पो. हवा. ७३८४, आर. एन. जाधव, पो. अंमलदार ८२८८ ए.बी. डोळसे तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील अंमलदार हजर होते. सदर शिबीरादरम्यान एकुण ५९ अधिकारी/अंमलदार तसेच इतर महिला व स्टाफ यांचे चेक करुन त्यांना टीम कडुन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
वरील तपासणी शिबीर हे रोटरी क्लब ऑफ इंडिया कात्रज यां सस्थेतर्फे श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ५, पुणे शहर यांचे तसेच श्री. धन्यकुमार गोडसे, सहायक पोलीस आयुक्त साो, वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मनिषा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांच्यामार्फत नियोजित करण्यात आले होते.