मराठी भाषा दिनानिमित्त १ हजार गाणी गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबाबत चिकित्सक समुह शिरोळकर हायस्कूलचे राज ठाकरेंकडुन आभार..

संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई ;


महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा अंतर्गत चिकित्सक शाळेने मराठी भाषादिना निमित्त सलग एक हजार मराठी गाणी गाण्याचा केलेला विक्रम (इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड) याची दस्तुरखुद्द मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी दखल घेत शाळेला अभिनंदन व शुभेच्छा पत्र पाठवले.
सदर पत्र मनसे मलबारहील विभाग अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी श्री निलेश शिरधनकर यांनी शाळेत सुंदर कार्यक्रम आयोजित करून शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती.संचिता गावडे व इतर शिक्षक वर्ग व संपुर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सदरचे पत्र शाळेला सुपूर्त केले सोबत मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती श्री. जितेंद्र गोंजी – कार्यालय अध्यक्ष मनसे यानी दिली.