मानवी आरोग्यास धोकादायक असणारया गुटखा विक्री करणाऱ्यास महाड MIDC पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उप संपादक – राकेश देशमुख

महाड :

महाड MIDC पोलिस ठाणेस पुढीलप्रमाणे कॉ. गुन्हा रजी नंबर 71/2025 बी एन एस एस 3 (5),123,223,275 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 26(2),26(4),मो. वा. का. कलम 3(1),181 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

1)घडला ता. वेळ ठिकाण:-   08/07/2025 रोजी सकाळी 10.00 वाजण्याचे दरम्यान मौजे नागलवाडी फाटा येथे

2) दाखल ता. वेळ:-
08/07/2025 रोजी 16.55 वा.

3) फिर्यादीचे नाव: सुनील संदिपान पाटील पोशी/ 1866 वर्षे 38 रा. पोलीस कॉलनी तालुका महाड, जिल्हा रायगड. मोबाईल नंबर 8626031921

4) आरोपीचे नाव – 1. (विधिसंघर्षित बालक) वय 17 वर्षे राहणार नडगाव बौद्ध वाडी

  1. विवेक धोंडीराम ठोंबरे राहणार नडगाव बौद्धवाडी वय 32 वर्षे
  2. रफिक मेमन, महाड शहर
  3. नजीर मेमन, म्हसला

5) मिळाला माल –

  1. 50000/- – एक लाल पांढरा रंगाची सुझुकी एसेस कंपनीची स्कुटी mh06 सी आर 5144 कि अं
  2. 2800/- रुपये किमतीची विमल पान मसाला एकूण 07 पॉकेट त्यांचेवर छापील किमत प्रत्येकी 198 असून विक्रीची किंमत प्रत्येकी 400 रुपये आहे
  3. 350/- रुपये किमतीची v-1 तंबाखू लाल रंगाचे एकूण 07 पॉकेट त्यावर छापील किंमत प्रत्येकी 22 असून विक्रीची किंमत प्रत्येकी 50 रुपये अशी आहे
  4. 1200/- रुपये किमतीचा केसर युक्त पान मसाला एकूण 4 पॉकेट त्याचेवर छापील किंमत प्रत्येकी 187 असून विक्रीची किंमत प्रत्येकी 300 रुपये अशी आहे.
  5. 300/- रुपये किमतीचा v-1 तंबाखू हिरवा रंग असलेले एकूण 02 पॅकेट त्याच्यावर छापील किंमत प्रत्येकी 33 असून विक्रीची किंमत प्रत्येकी 150 रुपये अशी आहे
  6. 1200/- रुपये किमतीची महक सिल्वर पान मसाला एकूण 03 पॅकेट त्याच्यावर छापील किंमत प्रत्येकी 112.50 असून विक्रीची किंमत प्रत्येकी 400 अशी आहे

7. 6900/- रुपये किमतीचा m-1 जर्दा तंबाखू एकूण 69 पॅकेत त्यांच्यावर छापील किंमत प्रत्येकी 22.50 असून विक्रीची किंमत प्रत्येकी 100 रुपये अशी आहे

62750/- एकूण रक्कम

6) हकीकत – वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील विधी संघर्षग्रस्त बालक राहणार नडगाव बौध्दवाडी तालुका महाड जिल्हा रायगड व त्यांचा नातेवाईक विवेक धोंडीराम ठोंबरे राहणार नडगाव बौद्धवाडी यांच्याकडून मानवी आरोग्यास अपायकारक आहेत व त्यावर महाराष्ट्र शासन राज्य पत्र व साधारण भाग चार अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत नियम व नियमाने 2011 क्रमांक असुमाअ/अधिसूचना 500/7 दिनांक 15 जुलै 2021 च्या आदेशान्वये नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या अधिसूचनाद्वारे विक्री व साठा करण्यास प्रतिबंध केला आहे हे माहीत असताना सुद्धा शासनाचे आदेशाची अवज्ञा करून प्रतिबंधित मालाची विक्री करण्यासाठी जवळ बाळागलेल्या स्थितीत मिळून आला तसेच त्याच्याकडे गाडी चालवण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नाही म्हणून

7)  तपासी अंमलदार – पोसई जे.पी गायकवाड नेमणूक महाड एमआयडीसी पोलीस ठाणे   
मोबाईल नंबर 98231 01500

8) दाखल अंमलदार:-*   मपोहवा/100 एन. एस. गायकवाड, नेमणूक महाड एमआयडीसी पोलीस ठाणे   
मोबाईल नंबर 8793402100

9) प्रभारी अधिकारी –
सपोनि श्री जे एच माने पोलीस ठाणे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे
मोबाईल नंबर 8552874434
10) गुन्हे तपास –
तांत्रिक पूर्तता : गुन्हा DCR थर्ड आय मध्ये भरला आहे.
इ साक्ष मध्ये पंचनामा केला आहे.

आरोपींचा पूर्व इतिहास तपासला आहे आरोपी नंबर 4 याच्यावरती 2015 साली प्रोहीबीशन ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे.

गुन्ह्याला सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे परंतु फॉरेन्सिक टीमची आवश्यकता नसल्याने बोलावण्यात आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट