मनवेलपाडा सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मा. श्री. स्वप्नील कदम राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित..!

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
विरार :
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी नालासोपारा विरार येथील मनवेलपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्नील कदम हे आपल्या पोलीस अभिलेखावरील करत असलेल्या अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरक्षा पोलीस टाइम्स या वृत्तवाहिनीनी त्यांच्या कामाची दखल घेतली .
या सन्मानार्थ त्याना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधी श्रीमती नुतन गौड ,हेमलता पवार, निलीमा कदम, विजया रूके आदि प्रतिनिधी उपस्थित होते.