मानपाडा पोलीसानी २.१२ कोटी रकमेपेक्षा अधिक किमतीचा अंमली पदार्थ परदेशी नागरिकाकडून जप्त

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

मानपाडा

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एमडी) काही दिवसा अगोदर पकडण्यात आलेले होते त्याअनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत असताना मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७ रोजी निळजे गाव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकुन सदर ठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी कडुन एकुण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) कि.अं २.१२ कोटी रकमेपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करून गु.र.नं ७८७/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चचे कलम ८ (क), २१(क) २२(क) मध्ये त्यास अटक केली. सदरचा आरोपी हा मुळ राहणार IVORY COST देशातील असुन पुढील तपास वरिष्ठाच्या मा्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आले. यापूर्वी सुद्धा दिनांक २७ रोजी गुरनं ७३१/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१ (क) २२ (क) अन्वये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एमडी) पकडण्यात आलेले होते त्याअनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत असताना वरील माहीती मिळाल्याने यशस्वी कारवाई करण्यात आली. तसेच यापुर्वी दाखल केलेल्या गु.र.नं ७३१/२०२५ मधील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख याचेकडुन बेंगलोर येथील चोरीची गाडी एम.डी सह ताब्यात घेण्यात आलेली माहिती देण्यात आली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, आशुतोष डुंबरे , पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव,पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल शेंडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त डोचिवली विभाग सुहास हेमाडे, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि/सागर चव्हाण, सपोनि/अजय कुंभार, पोहवा/६९०३ पाटील, पोहवा/६६७२ माळी, पोहवा/६९२१ राठोड, पोशि/८४११ आडे, पोशि/७७७९ गरूड, पोशि/ ३८१९ झांझुणे, पोशि/८२१५ चौधर यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट