लोन करण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फी म्हणून लाखो रूपयांची फसवणुक करणारे मानपाडा पोलीसांच्या ताब्यात…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

मानपाडा: दिनांक ०५/१२/२०२२ रोजी फिर्यादी श्री. अनिल कारभारी आव्हाड यांनी मानपाडा पोलीस ठाणेत येवुन फिर्याद दिली की, त्यांना त्यांचे रुमचे लोन घेणेसाठी ते विविधn बँकांमध्ये प्रयत्न करीत होते. फिर्यादी यांना दिनांक २२/०९/२०२२ रोजी आर. के. शर्मा नावाचे व्यक्तीचा फोन आला त्यावेळी त्याने तो बजाज फायनॅन्समधुन बोलत असुन, तुमचे नावावर १० लाखाचे लोन पास झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना बजाज फायनॅन्सचे नावाने १० लाख रुपयाचे लोन मंजुर झाल्याचे फोन व मॅसेज वारंवार येवु लागले तसेच लोन पाहिजे असल्यास शषांक प्रसाद यांचे नांवे कोटक महिंद्रा, दिल्ली या बॅकेचे अकाऊंटवर प्रथम ३०,००० /- रु प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगण्यात आले, त्याप्रमाणे फिर्यादी यांनी लोन मंजुरीसाठी ३०,००० / – रु शषांक प्रसाद यांचे बॅक अकाऊंटवर पाठविले.

त्यानंतर सदर इसमांनी फिर्यादी यांना वारंवार प्रोसेसिंग फी साठी आणखी रक्कम लागेल तसेच तुमचे लोन २७ लाख रुपये मंजुर झाले आहे. त्यासाठी आणखी रक्कम भरणा करावी लागेल असे फिर्यादी सांगितल्याने, फिर्यादी यांनी सदर इसमांचे बोलण्यावर विश्वास ठेवुन वारंवार वेगवेगळया खात्यावर फिर्यादी यांना पैसे पाठविणेस भाग पाडुन, तसेच तुम्ही पैसे भरले नाहीतर तुमचे यापुर्वी भरलेले पैसे बुडतील अशा प्रकारची माहिती देवुन फिर्यादी यांचेकडुन एकुण ७,३४,५०० / – रु विविध बँक अकाऊंटवर भरणा करण्यास भाग पाडले, फिर्यादी यांनी लोनचे संबधात सदर इसमांशी बोलणे केले असता, त्यांनी आणखी एक लाख रुपये भरणा करण्यास फिर्यादी यांना सांगितले. यावरुन फिर्याछी यांना सदर इसमांचा संशय आल्याने तसेच त्यांची फसवणुक झाल्याचे समजुन आल्याने त्यांनी मानपाडा पोलीस ठाणेत दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पो.स्टे. गुरनं ९३४ / २०२२ भादविक ४२०, ३४ सह आय. टी. अॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीचे आधारे वपोनिरी. मानपाडा पो.स्टे. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना लागलीच योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन फिर्यादी यांनी ज्या 1. बँकांमध्ये पैसे भरणा केले आहेत त्या बॅकांची माहिती प्राप्त करुन, सदरचे बॅक अकाऊंट लागलीच सिल करणेबाबत संबधित बॅकांशी पत्रव्यवहार केला. त्यावरुन सदरचे बॅक अकाऊंट सिल करण्यात आले. सदर बॅक अकाऊंटवर असलेल्या पत्यांची खात्री करणेसाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना लागलीच नवी दिल्ली येथे रवाना केले.

सदर बँक अकाऊंटचे पत्यांवर आरोपीत यांचा शोध घेतला असता, त्यातील नमन संजय गुप्ता हा आरोपीत अमृतसर येथे असल्याचे समजल्याने, त्याचा अमृतसर येथे शोध घेतला, त्यावेळी तो शिमला येथे गेल्याचे आढळुन आले. त्याप्रमाणे शिमला, हिमाचल प्रदेश येथे जावुन आरोपीत याचा शोध घेतला असता तो शिमला येथे एका लॉजवर मिळुन आला. सदर आरोपीत याचेकडे केलेल्या चौकशीत त्याचे साथीदार हे नोयडा, उत्तरप्रदेश व दिल्ली येथे राहत असल्याचे समजल्याने, त्याने दिलेल्या माहितीवरुन आकाशकुमार सुनिल चांदवानी यास दिल्ली येथुन व आरोपी रिशी दिपककुमार सिंग यास नोयडा, उत्तरप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपीत यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बनावट कागदपत्रांचे आधारे विविध बँकांमध्ये अकाऊंट उघडुन, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पुणे येथे राहणारे नागरीकांना बजाज फायनॅन्सचे लोन मंजुर झाल्याचे फोन करुन, त्याची प्रोसेस फि म्हणुन ०१ लाख रुपये सदर बनावट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगुन, सदरचे पैसे अकाऊंटमध्ये आल्यावर लागलीच लोन धारकांना त्यांचे सिव्हील चांगले आहे तुमचे अधिक लोन मंजुर होवु शकते असे सांगुन त्यांना प्रोसेस फी वाढवुन आणखी रक्कम सदर बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगुन, सदरचे पैसे प्राप्त झाल्यावर लोनधारक यांना आणखी प्रोसेसे फी भरावी लागेल नाहीतर यापुर्वी भरलेले पैसे बुडतील असे मॅसेज करुन त्यांचेकडुन आणखी रक्कम प्राप्त करुन घेवुन नागरीकांची फसवणुक करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नमुद गुन्हयात आरोपीत नामे १) नमन संजय गुप्ता, वय २२ वर्षे रा. ५५३, जीवन पार्क, सिरजपुर, दिल्ली २) आकाशकुमार सुनिल चांदवानी, वय २८ वर्षे रा. १९१, ए / २, जि. रोहिणी, दिल्ली ३) रिशी दिपककुमार सिंग वय २८ वर्षे, रा. घर नं. २१४५, मालकागंज चौक, दिल्ली यांना अटक करण्यात आलेली असुन, त्यांचेकडुन गुन्हयातील गेला माल ७,३४,५००/- रु तसेच ०५ मोबाईल फोन, एटीएम कार्ड असा एकुण ९,२१,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण, मा. श्री. सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. श्री. शेखर बागडे, पोनि . ( प्रशा) श्री. सुरेश मदने, सपोनिरी. अविनाश वनवे, सपोनिरी. सुनिल तारमळे, पोहवा / सुशांत तांबे, पोहवा / सुनिल पवार, पोना / भिमराव शेळके, पोना / प्रविण किनरे, पोशि/ बालाजी गरुड, पोशि/ संतोष वायकर यांचे पथकाने केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट