मनोर पोलीस ठाणे येथे दाखल दरोड्याचे प्रयत्नाच्या गुन्ह्यातील ७आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.

दि.१३/०७/२०२५ रोजी रात्रीचे ०२.४० वाजण्याचे सुमारांस फिर्यादी नामे प्रसाद विजय पाटील वय २८ वर्षे, रा नानीवली, ता. जि. पालघर यांचे राहते घरी यातील आरोपी हे दरोडा टाकण्याचे इराद्याने आपसात संगणमत करून तोंडाला रूमाल बांधून, हातात लोखंडी रॉड, चिकटपट्टी सेल, अग्निशस्त्र घेवून फिर्यादीच्या राहते घराचा मुख्य दरवाजा लोखंडी रॉडने तोडत असताना फिर्यादीस जाग आल्याने तसेच आरडाओरड केल्याने फिर्यादीचे घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करताना पळून गेले म्हणून फिर्यादीचे तक्रारीवरून मनोर पोलीस ठाणे येथे गु.रं.नं. १ २११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१(४), ६२, ३१०(४), ३१०(५), ३१२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी सदर गंभीर गुन्हयाची योग्य ती दखल घेवुन पोनि/रनवीर बयेस, मनोर पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मनोर पोलीस ठाणेचे पथकाने नमुद गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती घेवून तांत्रीक विश्लेषनाचे मदतीने तसेच गोपणीय बातमीदाराच्या मदतीने दरोड्यामध्ये एकूण ७ आरोपी निष्पन्न करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे.

१) संदीप अशोक वळवी, वय ३६ वर्षे, रा. कासा, वळवीपाडा, ता. डहाणु, जि. पालघर,

२) तुषार गणेश रटाटे, वय १९ वर्षे, रा. कासा, वळवीपाडा, ता. डहाणु, जि. पालघर,

३) ऋषिकेश भगवान गुरव, वय २४ वर्षे, रा. कुंज, पो. कासा बुद्रुक, ता. विक्रमगड, जि. पालघर.

४) रामदास रमेश सालकर वय २५ वर्षे, रा. देहजे, ता. विक्रमगड, जि. पालघर.

५) प्रणय गंगाराम गावित, वय १९ वर्षे, रा. धामणी, पो. कासा बुद्रुक, ता. विक्रमगड, जि. पालघर.

६) अमोल अशोक वांगड, वय २० वर्षे, रा. वाघाडी, वांगडपाडा, ता. डहाणु, जि. पालघर.

७) भरत जयवंत मेढा, वय ३८ वर्षे, रा. घाणेघर, पो. भोपोली, ता. विक्रमगड, जि. पालघर.

सदर आरोपीत यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली ५,००,०००/- रुपये किंमतीची MH48-BH-2820 क्रमांकाची मारुती कंपनीची राखाडी रंगाची इको कार जप्त करण्यात आली. सदर आरोपींनी डहाणु पोलीस ठाणे गु.र.नं. १०१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०३, ६२ प्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपींना अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पालघर यांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून अटक आरोपीत यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र, लोखंडी रॉड जप्त करणे बाकी आहे. तसेच सदर गुन्ह्यात अटक आरोपी व्यतिरिक्त आणखी इतर साथीदार आहेत किंवा कसे, इतर आणखी कोणते गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत मनोर पोलीस तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक श्री. वतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, श्री. अभिजीत धाराशिवकर यांचे मार्गदर्शनानुसार पोनि/रनविर बवेस, मनोर पोलीस ठाणे, तसेच मनोर पोलीस ठाणेचे पोलीस पथकाने केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/संग्राम पाटील, नेमणुक मनोर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट