मान हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने पालघर रेल्वे अधिकाऱ्यांचा केला सन्मान सोहळा..!

प्रतिनिधी : संदेश मोरे
पालघर : – मान हसमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे आज दि. २ ऑक्टोबर २०२४ महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती चे औचित्य साधून लोहमार्ग अधिकाऱ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी पालघर
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, आर.पी.एफ. चे pi विनीत कुमार, स्टेशन मास्टर मुकेशचंद्र सोनी, किशोर जी (cmi ), आर. पी. फ.psi योगेंद्र मकवाना यांचा कुशल अधिकारी म्हणून गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गावंडे, संस्थेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. गजानन पाईकराव, माजी नगरसेवक राजेश गायकवाड, संस्थेचे पदाधिकारी, तसेच महाराष्ट्रा पोलीस बॉईज संघटनाचे जिल्हा महासचिव मंगेश उईके तसेच इतर पदाधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.






प्रा. डॉ. गजानन पाईकराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टरित्या केले. अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना हे अधिकारी रिल हिरो नसून रिअल हिरो आहेत, पडद्यावर दिसणारे हिरो हे फक्त अभिनय साकारत असतात रिअल हिरो आणि अभिनय करणाऱ्या हिरो मध्ये जमीन असमानाचा फरक असतो. आम्ही या अधिकाऱ्यांच्या कार्याचा अनेक दिवसापासून गुपचूपपणे आढावा घेत होतो. आमच्या निदर्शनास शंभर टक्के हेच रिअल हिरो असल्याची भावना जागृत झाली आणि अश्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे हे समाजासाठी त्यांच्या कार्याला व इतर अधिकाऱ्यांनाही प्रोत्साहन देणारा क्षण ठरावा आणि तो क्षण महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती चा औचित्य साधून त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गावंडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात
आला. व त्यांच्या कार्याचे कौतुकही करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com