मांगरुळचे अभिजित कुंभार यांची मनपा उपायुक्तपदी निवड…!
उपसंपादक – रणजित मस्के
शिराळा( मांगरूळ ) :- अंगी जिद्द आणि चिकाटी असली की आत्मविश्वासाच्या जोरावर यश खेचून आणता येते हे नालंदा अभ्यास केंद्राचे मांगरुळ ता. शिराळा येथील ध्येयवादी युवक अभिजित वसंत कुंभार यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत अभिजित कुंभार यांनी घवघवीत यश संपादित करित महापालिका उपायुक्त / मुख्याधिकारी क्लास वनपदी निवड झाली आहे.
गेल्या वर्षीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अभिजित कुंभार यांनी बाजी मारत उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली होती. सध्या ते परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा येथे कार्यरत असून नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहेत. अश्यातच नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या सन २०२१ च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. आणि अभिजित कुंभार यांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश खेचून आणत महानगर पालिका उपायुक्तपदाला गवसणी घातली.
त्यांना आई वडील व नालंदा अभ्यास केंद्राचे संस्थापक दिपकभाऊ कांबळे यांने मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल मांगरुळ गावातील तरुणांनी तसेच नालंदा अभ्यास केंद्रातील विद्याथ्र्यांनी गुलालाची उधळण करीत, फटाके लावून आनंद व्यक्त केला.

प्रामाणिक प्रयत केल्यास यश निश्चित विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा. मनात जिद्द अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चितच मिळते. ग्रामीण भागातील युवकांनी अभ्यासाचे योग्य नियोजनातून यश खेचून आणावे आणि आपल्या आई वडील गावाचे नाव मोठे करावे.
आपल्या यशात ज्यांचे, ज्यांचे योगदान आहे त्यांना कधीही विसरू नका असे मत श्री अभिजित कुंभार यांनी मांडले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com